विशाळगडावर "दंगल "व्हीडीओ फुटेजच्या आधारे २१ आरोपींना अटक: जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न:सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर.

 विशाळगडावर "दंगल "व्हीडीओ फुटेजच्या आधारे २१ आरोपींना अटक: जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न:सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर.

---------------------------------------

करवीर तालुका प्रतिनिधी

 मयुरेश कुंभार.

---------------------------------------

कोल्हापूर: 

 विशाळगड अतिक्रमण हटवावे या मागणीच्या अनुषगांने झालेल्या आंदोलनातील जमावाने विशाळगड पायथाशी असलेल्या  दुकानांची, दर्ग्याची तोडफोड केली .गजापुर येथील नागरिकांच्या घरांची, वाहनांची व इतर वस्तुंची  तोडफोड व बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेवर केलेली दगडफेक व धक्काबुक्की या अनुषंगाने शाहुवाडी पोलीस ठाणे येथे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गृह अतिक्रमण करणे, स्फोटक पदार्थाव्दारे आगळीक करणे, धार्मिक स्थळांची नासधुस करणे, धार्मिक भावना दुखावणे, स्फोटक पदार्थाबाबत निष्काळजीपणाचे वर्तन करणे, ज्वालाग्रही पदार्था बाबत निष्काळजीपणाचे वर्तन करणे, दोन गटामध्ये शत्रुत्व वाढविणे, बेकायदेशिर जमाव जमवुन शस्त्र बाळगणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, लोकसेवकावर हल्ला करणे, जमावबंदी आदेशाचा भंग करणे अशा विविध कलमान्वये ४ गुन्हे दाखल करणेत आले असुन आता पावेतो २१ आरोपींना व्हीडीओ फुटेजच्या आधारे अटक करण्यात आलेली आहे.


सदर घटनेतील 1] सुशांत आत्माराम सरदेसाई, (वय- २८) रा. बालाजीनगर कणेरीवाडी ता. करवीर,२] गोपी कुडलिक सुर्यवंशी वय ३०, रा. कागदेमाळ, गोकुळशिरगाव ता. करवीर,३] चेतन आनंदराव जाधव वय ३०, रा.७१०, ईवॉर्ड, लाईनबझार कसबाबावडा ता करवीर

४] ओंकार दादा साबळे वय २१, रा. चौगले गल्ली कसबा बावडा ता करवीर,५] प्रेम पंडीत पाटील वय २१, जयभवानी कॉलनी, कसबा बावडा, कोल्हापुर,६] रोहन पांडुरंग पाटील वय २५, रा. गोळीबार मैदान कसबाबावडा कोल्हापुर,७] दिपक तानाजी सोळवंडे, वय २६, रा. गोळीबार मैदान, नेजगाव कॉलनी कोल्हापुर,८] नितीन बाबुराव वर्षे वय ५१, रा. शिक्षक कॉलनी, आमराई रोड, इचलकरंजी ता. हातकणंगले कोल्हापुर ९] प्रकाश गणपतराव मोरबाळे वय ४७, रा. प्लॉट नंबर ४, जिजामाता सोसायटी जवाहरनगर इचलकरंजी, ता. हातकणंगले,१०] मधुकर बब्रुवान गुरव वय ४५, रा. गावभाग महादेव मंदीर जवळ, इचलकरंजी ता. हातकणंगले,११] सिध्दार्थ धोडीबा कटकधोंड वय ३०, रा.२८३२ बी वॉर्ड, घणभाग, जवाहरनगर, ता. करवीर,

१२] सुरज मानिक पाटील वय २९, रा. चावडी गल्ली कसबाबवाडा, कोल्हापुर,१३] सुशांत दिनकर उलपे वय २६, रा. कुलपेमळा कसबा, बावडा कोल्हापुर,१४] आदित्य अविनाश उलपे वय २९, रा. २७० इ वॉर्ड उपले गल्ले कसबा बावडा कोल्हापूर,१५] मधुसुदन प्रताप भोई वय ३५ रा. १७/३५८ मुरदंडे मळा गल्ली नं १ इंचलकरंजी

१६] ओंकार सुनिलसिंह राजपूत वय २९ राई वॉर्ड जाधववाडी, मार्केट यार्ड कोल्हापूर ,१७] ओकार तुकाराम चौगुले वय २१ रा. गुरव गल्ली, गोकूळ शिरगाव जि. कोल्हापूर,१८] योगेश चंद्रकांत भाट वय ३३ रा टेबलाईवाडी, घाडगे पाटील समोर उचगाव कोल्हापर,१९] योगेश चांगदेव पाटील वय ४३, रा गणेशनगर २२/८१४ इंचलकरंजी ता. हातकणंगले. २०] महेश आनंदा पाटील वय २२ रा. गुरवगल्ली गोकूळ शिरगाव ता. करवीर जि. कोल्हापूर,२१] सचिन विठ्ठल संकपाळ वय ४२ रा. गुरव गल्ली गोकूळ शिरगाव ता. करवीर यांना अटक करण्यात आली आहे.


रविवार झालेल्या घटनेत बंदोबस्तासाठी असणारे श्री. निकेश खाटमोडे पाटील, अपर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज विभाग यांचेसह श्री. अजित टिके उप विभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग, श्री. आपासो पवार, उप विभागीय पोलीस अधिकारी शाहुवाडी विभाग, पोलीस निरीक्षक विजय घेरडे, संजिव झाडे, सुशांत चव्हाण, सहा पोलीस निरीक्षक रणजित पाटील, मददसुर शेख, पोलीस उप निरीक्षक शेष मोरे, अमित पाटील, पोलीस अमंलदार विठठल बहिरम, बालाजी पाटील, रोहित मर्दाने जगताप हे सदर जमावाला नियंत्रित करत असताना जमावाने केलेल्या दगडफेकीत जखमी झाले आहेत.


विशाळगड व परिसर या भागात तसेच संपूर्ण जिल्हयामध्ये योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला असुन संपुर्ण जिल्हयामध्ये शांतता आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व शांतता राखावी असे आवाहन कोल्हापूर पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.



चौकट:


सदर दाखल गुन्हयातील उर्वरित आरोपीची व्हीडीओ फुटेजच्या माध्यमातुन ओळख पटविणेचे काम सुरु आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने कोणीही सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत केल्यास त्यांचेवरही कायदेशिर कारवाई करण्यात येईल. सोशल मिडीया मॉनिटरिंग सेलच्या माध्यमातुन यावर लक्ष ठेवण्यात येत आहे

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.