जागर फाउंडेशन कोल्हापूर तर्फे मुडशिंगीत वृक्षारोपण.

 जागर फाउंडेशन कोल्हापूर तर्फे मुडशिंगीत वृक्षारोपण.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज् महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार.

 -------------------------------

"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे,

"वृक्ष लागवड सारखा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम जागर फाउंडेशन कोल्हापूर यांनी हाती घेतला याबद्दल धन्यवाद. हि लावलेलि रोपे जगतील आणि त्यांचे मोठ्या वृक्षात रूपांतर होईल असे त्यांचे चांगले संगोपन केले जाईन.अशी आशा व्यक्त करतो". असे प्रतिपादन तहसीलदार करवीर यांनी या वृक्षारोपण प्रसंगी केले.

करवीर तालुक्यातील गडमुडशिंगितील दसरा चौकात आज जागर फाउंडेशन, कोल्हापूरने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रम करवीरचे तहसीलदार श्री स्वप्नील रावडे, कोल्हापूर प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण आणि मुडशिंगी च्या प्रथम नागरिक सरपंच श्रीमती शिरगावे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री चव्हाण साहेब म्हणाले की "वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. रस्ते, रेल्वे, शेत जमिनीसाठी अशा कारणासाठी मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृक्षतोडीमुळे ग्लोबल वार्मिंगची समस्या निर्माण झाली. यावर उपाय म्हणून वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे." गावच्या नागरिक प्रथम नागरिक आणि सरपंच श्रीमती अश्विनी शिरगावे म्हणाल्या, "दरवर्षी जागर फाउंडेशन कडून हा अत्यंत स्तुत्य उपक्रम पार पाडला जातो. अलीकडे घेतलेल्या त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमास मी उपस्थित आहे. यावर्षी लावलेली झाडे आम्ही आणि ग्रामपंचायत मिळून निश्चितपणे जगवू. त्याचे मोठे वृक्ष होतील आणि परिसरातील हवा शुद्ध होण्यास मदत होईल"

जागर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. बी. जी. मांगले म्हणाले," विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. तेवढ्या प्रमाणात पुन्हा वृक्ष लागवड होतेच असे नाही. त्यामुळे नागरिक, सामाजिक संस्था, तरुण मंडळे, ग्रामपंचायती यांनी पुढाकार घेऊन वृक्ष लागवड केली पाहिजे. तरच भविष्यकाळात सृष्टीचे चक्र व्यवस्थित राहील"

कार्यक्रमाची प्रस्तावना श्री भीमराव गोंधळी यांनी केली. तर कार्यक्रमास सुबराव पवार, जितेंद्र यशवंत जमाल मुल्ला, अर्जुन गोंधळी, रंगराव चौगुले, प्रवीण शेजवळ तलाठी, आदित्य दाभाडे सर्कल, अर्जुन कांबळे, अशोक गवळी,शिवाजी कांबळे, ओंकार पाटील,राजा जाधव, वैशाली गवळी व नागरिक उपस्थित होते..

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.