चिमुकलीवर अत्याचार,बापास २० वर्षे सक्तमजुरी.
चिमुकलीवर अत्याचार,बापास २० वर्षे सक्तमजुरी.
-------------------------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार/
-------------------------------------------
स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या वडील जगन्नाथ आडके या नराधमास वीस वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती कविता बी अग्रवाल यांनी सुनावली. ही घटना कोडोली ता. पन्हाळा येथील गणपती गल्लीतील आरोपी यांचे राहते घरी घडली होती.
पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की,
पिडीत ही आरोपीची सख्खी मुलगी आहे. घटनेच्या वेळी आरोपी हा आपली पत्नी, तिन मुलींसह गणपती गल्ली कोडोली येथे राहत होता. आरोपी व त्याची पत्नी हे दोघेही मोलमजुरीचे काम करीत होते. पिडीत मुलगी गणपती मंदिरातील अंगणवाडी मध्ये सकाळी ११-०० ते दुपारी २ ०० पर्यंत जात होती.
२२ फेब्रुवारी २०२० रोजी पिडीत मुलीच्या गॅदरींगचा कार्यक्रम सर्वोदय सांस्कृतीक हॉल, एम.एस.ई.बी.फाटा कोडोली येथे होता. त्या कार्यक्रमासाठी पिडीत मुलगी व तिची आई, बहिण, मावशी व मामा यांच्यासह गेली होती. गॅदरींग संपल्यानंतर ते सर्वजण आझाद गल्ली मध्ये फिर्यादीच्या [पिडीत मुलीच्या आईच्या ] माहेरी आले. तेथे पिडीत मुलीने आपल्या आईला व मावशीला शौचास करताना त्रास होत आहे असे सांगितले. पिडीतेच्या मावशीने पिडीत मुलगीची तपासणी केली असता अतिप्रसंग झाल्याचे लक्षात आले. याबाबत पिडीत मुलीने सांगितले की वडिलांनीच अतिप्रसंग करून कोणास काही सांगितलं तर मारणार असे धमकावले . सर्व हकिकत पिडीतेकडून समजल्यानंतर व पिडीतेची शारिरीक स्थिती पाहिल्या नंतर पिडीतेच्या आईने आपल्या पती विरुध्द कोडोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.
या गुन्हयाची सुनावणी मा. श्रीमती कविता बी. अग्रवाल, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कोल्हापूर, यांचे समोर झाली. अतिरीक्त सरकारी वकील अँड मंजुषा पाटील यांनी या कामी १२ साक्षीदार तपासले. या कामी पिडीत मुलगी तिची मोठी बहिण, आई व मावशी व मामा व वैद्यकिय अधिका-यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. तसेच पिडीत मुलीच्या गॅदरिंगवेळीच्या वर्तणुकीबाबत तिच्या शिक्षिकेंचा जबाब घेण्यात आला.
अँड .मंजुषा पाटील यांनी केलेला विस्तृत युक्तीवाद, न्यायालयासमोर मांडलेले वरीष्ठ न्यायालयातील न्यायनिवाडे व प्रत्यक्ष झालेला पुरावा ग्राहय मानुन न्यायाधीशांनी आरोपीं जग्गनाथ आडके यांस भा.द.वि.स. कलम ३७६ [२] [फ] [ज][क], ३७७ आणि पोक्सो कायदा कलम ४ सह कलम ३ ब,आणि कलम ६ सह ५ [म] [न] खाली दोषी ठरवून पोक्सो कायदा कलम ६ नुसार २० वर्षे सक्तमजुरी, व रु एक हजार दंड व दंड न भरलेस तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. तसेच पिडीत मुलीस नुकसान भरपाई मिळणेबाबत निर्देश दिले.सरकारपक्षातर्फ मंजुषा पाटील यांनी काम पाहीले. त्यांना या कामी पैरवी अधिकारी रोहिणी खोत पोलीस कॉन्टेबल यांनी मदत केली.
Comments
Post a Comment