रिसोड शहरात चिडीमारीला उधान निर्भया पथक कार्यान्वित करण्याची गरज.
रिसोड शहरात चिडीमारीला उधान निर्भया पथक कार्यान्वित करण्याची गरज.
----------------------------------
रिसोड प्रतिनिधी.
रणजीत सिंह ठाकुर
-----------------------------------
रिसोड शहरातील शाळा व कॉलेज सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी होत आहे शाळा व कॉलेज समोर तशेच लोणी फाटा ,बस स्थानक परिसरा मध्ये चिडीमारीला उधाण आले आहे शहरातील अतिक्रमण हि चिडीमारीला पुरक ठरत आहे चिडीमारीसह ट्रिपल सीट सुसाट वाहतुकीला आळा घालून निर्भया पथक कार्यान्वित करण्याची मागणी होत आहे.
शाळा कॉलेज सुरू होऊन जवळपास एक महिन्याचा कालावधी लोटला आहे शहरा पेक्षा हि ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे येथील श्री शिवाजी हायस्कूल, भारत माध्यमिक शाळा, व कन्या शाळा, उत्तमचंद बगडिया महाविद्यालय, पुष्पा देवी पाटील कॉलेज, आए टी आय कॉलेज ,या ठिकाणी मुला पेक्षाही मुलींची संख्या जास्त आहे या मुलींना बस स्थानक परिसरामध्ये टवाळखोरांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे शहरासह तालुक्यात मागील काही महिन्यापासून अवैध धंद्यांना तसेच अवैध प्रवासी वाहतुकीला मोठे उधान आले असून गुन्हेगारी वाढली आहे एखादे दिवशी बस लवकर निघून गेल्यास किंवा इतर कारणामुळे बस नसल्यास मुलींना काळी पिवळी ने जावे लागते काळी पिवळी मध्ये पूर्ण तिकीट घेऊनही मुलींना बसण्यासाठी जागा दिल्या जात नाही बस स्थानकावर होत असलेल्या त्रासामुळे काही पालक तर सर्व कामे सोडून आपल्या मुलींना दुचाकी वर ने - आण करत असल्याचे दिसून येत आहे तसेच शाळा व कॉलेज भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेला ट्रिपल सीट सुसाट वेगाने दुचाकी फिरविणे टाटिंग करणे हे तर नित्याचेच झाले आहे लोणी फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या रस्त्यावर संपूर्ण अतिक्रमण झाले आहे सकाळ संध्याकाळ या रस्त्यावर मोठी गर्दी होते भारत माध्यमिक कन्या शाळेच्या मुलींना अतिक्रमाना सह टवाळखोरांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे लोणी फाटा येथे मुलींना बस ची वाट पाहत थांबावे लागते या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात असले तरी ते जास्त वेळ साखरा फाटा व मेहकर रोडवरच अर्थकारण करीत असताना दिसून येतात मागील वर्षी निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली होती सकाळ संध्याकाळ निर्भया पथकाची स्कुटी वरून गस्त सुरू होती यावर्षी मात्र निर्भया पथक शहरात फिरताना कुठे आढळून येत नाही पोलीस प्रशासनाने चिडीमारांचा ट्रिपल सीट सुसाट वाहनांचा बंदोबस्त करून निर्भया पथक कार्यान्वित करावे अशी मागणी पालक वर्गाकडून केल्या जात आहे.
Comments
Post a Comment