कुंभोज येथे जे जे मगदूम होमिओपॅथिक कॉलेजचे आरोग्य शिबिर संपन्न.
कुंभोज येथे जे जे मगदूम होमिओपॅथिक कॉलेजचे आरोग्य शिबिर संपन्न.
-------------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
-------------------------------------
डॉक्टर जे जे मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जयसिंगपूर व ग्रामपंचायत मोफत होमिओपॅथी आरोग्य शिबिराचे आयोजन आज प्राथमिक आरोग्य पथक कुंभोज करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायतच्या सरपंच स्मिता चौगुले व उपसरपंच मा.उपसरपच अजित देवमोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचा प्रमुख 40 लाभार्थीने लाभ घेतला ,यावेळी डॉक्टर रफिया मुजावर, डॉक्टर दिग्विजय वाळवेकर, डॉक्टर समीर गायकवाड, डॉक्टर साक्षी गांधी, डॉक्टर कोमल धवसे, डॉक्टर धनश्री हांडे ,डॉक्टर मनाली चव्हाण डॉक्टर मिसबा गवंडी, डॉक्टर प्रीती चव्हाण व जनसंपर्क अधिकारी कुदळे सर उपस्थित होते.
यावेळी कुंभोज परिसरातील अनेक नागरिकांनी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्याकडून वेगवेगळ्या आजारावरती उपचार पद्धती जाणून घेतली एवढी सो सरपंच स्मिता चौगुले यांनी बोलताना अशा पद्धतीची कॅम्प कुंभोसारख्या परिसरात भरून जे जे मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजने कुंभोज ग्रामस्थांना केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी कुंभोज ग्रामस्थांच्या बरोबर ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment