आमदार मा. सुधीर (दादा) गाडगीळ यांचा आभार कार्यक्रम बामणोली दत्तनगर येथे घेण्यात आला.

 आमदार मा. सुधीर (दादा) गाडगीळ यांचा आभार कार्यक्रम बामणोली दत्तनगर येथे घेण्यात आला. 

-----------------------------------

मिरज तालुका  प्रतिनिधी 

राजू कदम 

-----------------------------------

आज बामणोली ग्रामपंचायत तर्फे सांगलीचे लोकप्रिय आमदार मा. सुधीर दादा गाडगीळ यांचा आभार कार्यक्रम घेण्यात आला. सांगलीचे आमदार सुधीर (दादा) गाडगीळ यांनी बामणोली दत्तनगरच्या खुल्या जागेत सभामंडपाला 21 लाख निधी मंजूर करून दिल्याबद्दल बामनोली ग्रामपंचायत तर्फे सरपंच सर्व सदस्य व गावातील ग्रामस्थ यांच्याकडून आमदार मा. सुधीर (दादा) गाडगीळ यांच्या आभार मानले. बंगले गावाचे पॅनल प्रमुख मा. सुभाष अण्णा चिंचकर आमदार सुधीर दादा गाडगीळ यांचे आभार मानत सुधीर दादांनी गावासाठी आज अखेर पर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोखा लोकांच्या निदर्शनास आणून दिला. आगामी विधानसभेला सुधीर दादा गाडगीळ यांच्या सोबत राहण्याचा बामणोली ,दत्तनगर ग्रामस्थांना आवाहान देखील केले. सभा मंडपाचे कामाचे श्रीफळ फोडून उद्घाटन केले. उद्घाटन वेळी पॅनल प्रमुख पै .सुभाष अण्णा चिचकर बामनोली लोकनियुक्त सरपंच सौ. गीताताई सुभाष चिंचकर, उपसरपंच विष्णू लवटे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य राजेश संगोळी, संतोष सरगर, अमित आवळे, सदस्य सै.रूपाली यमगर, सदस्य स्नेहल , मनीषा दुधाळ, सदस्य प्रियंका बामणे सदस्य सुनील पाटील, पोलीस पाटील शिवाजी चिनमुरे, तंटामुक्त अध्यक्ष चेतन आवटे, समित मगर, ग्राम संघाच्या सर्व महिला, सुखदेव व्हनमाने, महावीर दादा, किशोर देशमुख, विजय शेळके, अतुल सावंत, संजय घोडके, प्रवीण जाधव,  बामणोली येथील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते..

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.