उचगाव हद्दीत बेकायदेशीर आणि विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी नऊ बांधकाम धारकावर गुन्हा दाखल.

 उचगाव हद्दीत बेकायदेशीर आणि विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी नऊ  बांधकाम धारकावर गुन्हा दाखल.

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार 

-----------------------------

गांधीनगर :- महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना विभागाची परवानगी न घेता विनापरवाना आणि बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी सतिश प्रेमचंद वाधवा, महेश प्रेमचंद वाधवा (रा.199/2 उचगाव ता करवीर,) अनिल मारुतीराव निगडे (रा . माळी कॉलनी राजारामपुरी कोल्हापूर,) श्रीचंद बिकचंद गंगवानी, बलराम बिकचंद गंगवानी (रा . मोहिते मळा, वळीवडे ता करवीर ), विशाल पुंडलिक हंगीकर (रा. सावंत गल्ली उचगाव, ता करवीर,) संजय भिकू कांदेकर,  (रा.श्रीराम नगर उचगाव,) प्रथमेश किरण हावळ (रा . प्रियदर्शनी हाऊसिंग सोसायटी उचगाव ता करवीर) सचिन दिलीप गायकवाड (रा . राजाराम नगर कोरेगाव ता. वाळवा जिल्हा सांगली) या बांधकाम धारकावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला . याबाबतची फिर्याद नगर रचनाकार सचिन सदाशिव ताटे (रा. पुदेवाडी, पोस्ट बांबवडे ता. शिराळा जि. सांगली) यांनी दिली.


याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी उचगाव  ता करवीर गावच्या हद्दीत गट क्रमांक 199/2, आणि 391/4/5  या जागेवर नगर रचना विभागाची परवानगी न घेता अनाधिकृत रित्या बांधकाम सुरू ठेवले आहे. त्याचा पंचनामा शासकीय अधिकाऱ्यांनी करून  अधिनियम 1966 तरतुदी मधील कलम 52,54,(6) कलम 43 या कायद्याचा भंग करून बांधकाम सुरू ठेवले आहे या कारणावरून गांधीनगर पोलीस ठाण्यात नऊ बांधकाम धारकावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनय झुंजुर्के करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.