सातारा- आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी जावलीतील ७ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी ६६.९४ कोटी मंजूर करून घेतले ; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मिळवला निधी

 सातारा- आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी जावलीतील ७ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी ६६.९४ कोटी मंजूर करून घेतले ; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मिळवला निधी .

 -------------------------------------

सातारा जिल्हा प्रतिनिधी 

अमर इंदलकर

--------------------------------------- 

सातारा दि(२०) : सातारा- जावली विधानसभा मतदारसंघात रस्त्यांचे जाळे विणून विकासगंगा खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून आणखी ७ रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी तब्बल ६६ कोटी ९४ लाख ३७ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजेंनी या ७ रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा- २ मधून हा निधी मिळवला आहे. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ना. अजित पवार यांचे आभार मानले आहेत.         

सातारा- जावली मतदारसंघातील आटाळी ते पारंबे रस्ता (लांबी ३.८५० किमी) यासाठी ५ कोटी ७६ लाख ५३ हजार रुपये, एमडीआर ३१ आसनगाव परमाळे ते पिलानेवाडी रस्ता (लांबी ७.२०० किमी) यासाठी १० कोटी ७९ लाख ९ हजार रुपये, एमडीआर १३७ लिंब ते नागेवाडी कुशी रस्ता (लांबी ५.६०० किमी) या रस्त्यासाठी ८ कोटी ३७ लाख ८६ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. एसएच १४१ वरोशी ते वाटंबे वाहिटे रस्ता (लांबी ५.८०० किमी) या रस्त्यासाठी ८ कोटी ६९ लाख ७४ हजार रुपये, एनएच ४ रायगाव खर्शी ते सोनगाव रस्ता (लांबी १०.३७० किमी) यासाठी २२ कोटी ४० लाख ८४ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. 

           

किडगाव प्रजिमा १३७ ते कळंबे ते आकले रस्ता (लांबी ४.४२० किमी) या रस्त्यासाठी ५ कोटी १७ लाख १६ हजार रुपये तर, प्रजिमा २६ ते जाधव उंबरी रस्ता (लांबी ३.८०० किमी) या रस्त्याच्या कामासाठी ५ कोटी ७२ लाख ३४ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून मंजूर कामे तातडीने सुरु करा. कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.