कागल, करनुर येथे झालेल्या खून प्रकरणी चार जण ताब्यात तर आध्याप दोघे फरार .

 कागल, करनुर येथे झालेल्या खून प्रकरणी चार जण ताब्यात तर आध्याप दोघे फरार .

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

----------------------------------

दि ०८/०७/२०२४ रोजी कागल पोलीस ठाणेचे हद्दीत करनुर गावचे हद्दीमध्ये गुलाब बाबालाल शेख वय ६५ रा.करनुर ता.कागल जि. कोल्हापूर हे घरी जात असताना शेख मळयाजवळ दोन मोटर सायकल वरुन आलेल्या पाच ते सहा अज्ञात इसमांनी त्याचे डोक्यात कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले होते. त्यांना  उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात दाखल केले होते. गुलाब बाबालाल शेख यांचेवर सीपीआर रुग्णालयात उपचार चालु असताना ते दिनांक ११/०७/२०२४ रोजी पहाटे मयत झाले.


सदरची बाब ही गंभीर स्वरुपाची असलेने  पोलीस अधीक्षक  महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना सदर गुन्हयाचा समांतर तपास करणेकरीता योग्य त्या सुचना देवून मार्गदर्शन केले. मा. पोलीस अधीक्षक साो यांनी केले मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखेचे दोन स्वतंत्र तपास पथक तयार करुन सदर गुन्हयाचा तपास चालू केला.


गुन्हा सदर पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट दिली नंतर घटनास्थळी ठिकाणाची भौगोलिक परिस्थीतीची माहिती घेवुन तांत्रिक तपासणी केली असता सदरचा गुन्हा हा दोन मोटर सायकल वरील अज्ञात सहा इसमांनी केलेचे निष्पण झाले. नेमलेल्या दोन पथकानी तांत्रिक तपासणी व गोपणीय माहितीव्दारे सदरचा गुन्हा हा अदया, सोम्या, पत्या व त्यांचे इतर तीन साथीदार यांनी केला असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकाने इचलकरंजी परिसरात वरील चार आरोपींना ताबेत घेवुन त्यांचे नांवे पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नावे १) प्रर्णोत शिवाजी धनवडे रा. कबनूर ता. हातकणंगले २) आकाश नरेश कांबळे रा. चंदुर ता. हातकणंगले ३) सौरभ दिनकर जाधव रा. चंदुर ता. हातकणंगले ४) सम्मेद विजय ऐनापुरे रा. चंदुर ता. हातकणंगले असे सांगितली. सदर आरोपीत यांचेकडे कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांचे सोबत ५) आदित्य प्रकाश कांबळे रा. चंदुर ता. हातकणंगले ६) सुशांत जरळी रा. हलकर्णी असे असल्याची माहिती दिली त्यांचेकडे गुन्हया बाबत विचारणा केली असता ते घोडा गाडी शर्यतीसाठी घोडा विकत घेणेकरीता मतीवडे गावी दि.०८/०७/२०२४ रोजी गेले होते त्याच संध्याकाळी ६.३० वाचे सुमारास घरी परत येत असताना शेख मळयाकडे जाणारे रस्त्यावर मयत गुलाब बाबालाल शेख यांची मोटर सायकल आरोपी ला घासली त्यावेळी मयत व आरोपी यांचे मध्ये किरकोळ वादावादी झाली होती. त्या कारणातुनच वरील आरोपी यांनी संगनमत करुन गुलाब बाबालाल शेख यांचे डोक्यात कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करुन ते घटनास्थळावरुन मोटर सायकल वरुन पळुन गेले होते .सदर ताबेतील ४ आरोपी यांना पुढील कारवाईकरीता कागल पोलीस ठाणे येथे हजर केले असुन उर्वरित २ आरोपी यांचा शोध घेत आहोत.


सदरची कामगिरी  पोलीस अधीक्षक,महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक, निकेश खाटमोडेपाटील उप विभागीय पोलीस अधिकारी  आप्पासाहेब पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस निरीक्षक,  रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक,  सागर वाघ तसेच पोलीस अमंलदार सुरेश पाटील राम कोळी, विनायक चौगले, प्रविण पाटील, विनोद कांबळे, कृष्णात पिंगळे, संजय हुंबे, निवृती माळी, अशोक पवार यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.