पंढरपुरात राज्यातील पहिले कम निवास व्यवस्था असलेल्या बस स्थानकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.
पंढरपुरात राज्यातील पहिले कम निवास व्यवस्था असलेल्या बस स्थानकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.
--------------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
--------------------------------------
पंढरपुराच्या आषाढी यात्रेनिमित्त राज्यातील पहिल्या स्थानक कम यात्रे निवासाचे पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोक अर्पण करण्यात आले आहे. श्री शेत्र पंढरपूर येथे एसटी महामंडळाच्या जागेवर हे राज्यातील पहिले 34 फलाटांचे अति भव्य आशा चंद्रभागा यात्रा बस स्थानक आणि त्याला जोडून 1 हजार यात्रेकरू एकावेळी राहतील अशा यात्रे निवासाचे लोकार्पण आषाढी एकादशी दिवशी (17 जुलै) सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील उपस्थित राहणार आहेत. पंढरपूर येथे एसटी महामंडळाचे अद्यावत बस स्थानक आहे. या शेकडो बसेस राज्यभरात प्रवाशांची नियमित ने आण करता. तथापि, आषाढी आणि कार्तिकी सारख्या मोठ्या यात्रेसाठी ते बस स्थानक अपुरी पडत होते. म्हणून एसटी महामंडळाकडून आपल्या 11 हेक्टर जागेवर 34 फलाटांचे अति भव्य चंद्रभागा यात्रा बस स्थानक निर्माण करण्यात आले आहे. याबरोबरच पंढरपूरला दररोज येणाऱ्या भाविक यात्रेकरूची निवासाचे अल्प दरात सोय व्हावी या दृष्टीने बस स्थानकाला लागूनच यात्री निवास बांधण्यात आले आहे. या यात्रे निवासामध्ये एकाच वेळी सुमारे 1 हजार यात्रेकरू राहू शकतात. येथे एसटी कर्मचारी व यात्रेकरू साठी 2 सुसज्ज उपहारगृहे देखील बांधण्यात आले आहेत. हा राज्यातील एस टी महामंडळाचा पहिलाच प्रकल्प असून त्यासाठी तिथेच कोटी रुपये खर्च आला या भव्य प्रकल्पाचा लोक अर्पण सोहळा आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
500 एसटी कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था या बस स्थानकावरून आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी राज्यभरातील सर्व ठिकाणी एसटी बसेस शोधण्यात येणार आहे. येथे एसटीच्या सुमारे 500 कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय करण्यात आले असून याबरोबर सुमारे 1 हजार यात्रेकरू देखील राहतील , असे भव्य यात्री निवासी बांधण्यात आले आहे.
Comments
Post a Comment