दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल इस्पूर्ली येथे आषाढी वारी निमित्त संपन्न झाला दिंडी सोहळा.
दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल इस्पूर्ली येथे आषाढी वारी निमित्त संपन्न झाला दिंडी सोहळा.
---------------------------------------
बिद्री प्रतिनिधी
विजय कांबळे
---------------------------------------
आषाढीची चाहुल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात. आणि उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन हा सोहळा पाहत असतो.अखंड महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय या निमित्ताने पंढरपुरात नतमस्तक होतो. विद्यार्थ्यांनाही महाराष्ट्राची संस्कृती समजावी इतिहास कळावा या उद्देशाने आज आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर दुधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल इस्पूर्ली येथे दिंडी सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला अनेक मुले पंढरीचा वारकरी या वेशात आले होते.भक्तिगिते तसेच विठ्ठल नामाच्या जयघोष करत ह्या मुलांनी गावातून फेरी काढली. शाळेत आल्यावर भव्य रिंगण सोहळा पार पडला. विशेष म्हणजे विवेक घराळ या विद्यार्थ्यांने स्वता घोड्यावर स्वार होत ह्या रिंगणात सोहळ्यास रंगत आणली.अगदी हुबेहुब पणे हा रिंगण सोहळा पार पडला.अशा पध्दतीने भक्तिमय वातावरणात या आषाढी वारीची सांगता झाली. यासाठी शाळेच्या प्राचार्या सौ मीरा राऊत मॅडम व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment