कुपवाड बामणोली येथे धारदार शस्त्राने तरुणाचा खून.

 कुपवाड बामणोली येथे धारदार शस्त्राने तरुणाचा खून. 

-------------------------------------

मिरज तालुका प्रतिनिधी 

राजू कदम 

-------------------------------------

जुन्या वादातून दोन मित्रांच्या ग्रुप मध्ये झालेल्या भांडणात धारदार शस्त्राने छातीवर, पोटावर वार करून तरुणाचा खून केल्याची घटना मिरज तालुक्यातील बामणोली मायाका नगर येथे मंगळवारी दुपारी ही घटना घडली. राहुल मोहन नाईक ( वय 25 रा, मायाका नगर , बामणोली, तालुका मिरज ) असे खून झालेला तरुणाचे नाव आहे. 

नाईक गटाने केलेल्या प्रति हल्ल्यात धोंडीराम वसंत दुधाळ (वय 30 रा मायकल नगर, बामणोली ) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे, तर त्याचा भाऊ सुधाकर वसंत दुधाळ (वय 28 )हा किरकोळ जखमी झाला आहे. जखमींवर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत कुपवाड पोलीस ठाण्यात सुरू होते. 

राहुल नाईक व हल्लेखोर धोंडीराम आणि सुधाकर दुधाळ यांच्यात पूर्वीपासून मैत्रीचे संबंध होते. गेल्या वर्षापासून त्यांच्यात काही कारणावरून वाद निर्माण झाला होता. दोन्ही गटात जुन्या वादाचे कारण सतत घुमसत होते. मंगळवारी दुपारी कुपवाड एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये दोन्ही मित्रांचे गट वेगवेगळ्या ठिकाणी बसले होते. हॉटेल मधून दोन्ही गट बाहेर आल्यावर त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. काही वेळानंतर बामणोली मायाक्का नगर मधील अंगणवाडी समोर रस्त्यावर पुन्हा दोन्ही गटात वाद चिघळला. त्यातून दोन्ही गटात धारदार शस्त्राने एकामेकावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात राहुल नाईक यांचा छातीवर, पोटावर, वर्म घाव बसल्याने तो रक्तबंबळ झाला. 

तसेच नाईक गटाने केलेल्या प्रति हल्ल्यात धोंडीराम दुधाळ हा गंभीर जखमी झाला. तर त्याचा भाऊ सुधाकर दुधाळ हा किरकोळ जखमी झाला. राहुल यांच्या नातेवाईकांनी त्याला सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले, पण उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जखमी दुधाळ बंधूंना मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणातील दोन्ही गटातील काही संशय त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केले आहे..

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.