सायबर पोलीस स्टेशन नांदेड यांच्या सतर्कतेमुळे तक्रारदार यांच्या खात्यातून गेलेले 55 लाख रूपये मिळाले परत.
-------------------------------
लोहा प्रतिनीधी
अंबादास पवार
-------------------------------
दिनांक 18/01/2024 रोजी फिर्यादी यांना Wells Capital Whatsaap group वर Foreign Institutional Investor (FII) Wells Capital account च्या माध्यमातुन IPO वर पाच पट फायदा झाल्याचे आमिष दाखविले. सदरचे अॅप SEBI Register असल्याचे व अॅप खरे असल्याचे भासवून फिर्यादी यांना Foreign Institutional Investor (FII) Wells Capital account च्या माध्यमातुन IPO खरेदी करण्यासाठी फिर्यादी यांना त्यांचे बँक खात्यातून 71 लाख रूपये गेले होते. तक्रारदार यांना आपली फसवणुक झाल्याचे समजले. तक्रारदार यांनी सायबर पोलीस स्टेशन नांदेड येथे धाव घेतली. सायबर पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अमंलदार यांनी तात्काळ तक्रारदार यांची तक्रारीची गंभीर दखल घेत. टोल फ्री नंबर 1930 या सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवर रजिस्टर करून घेतली व सदरची तक्रार N.C.C.R.P पोर्टलव्दारे स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी संबंधीत बँकेचे नोडल अधिकारी यांना मेल पाठविण्यात आले. तसेच तक्रारदार यांना सायबर पोलीस स्टेशन गु.र.नं.01/2024 अन्वये गुन्हा दाखल करून अधिक तपास केला व तक्रारदाराचे एकुण 71 लाखरूपये रक्कमेपैकी 63 लाख रूपये होल्ड करण्यात सायबर पोलीसांना यश आले. एवढी मोठी रक्कम ऑनलाईन गेल्याची नांदेड जिल्याची पहिलीच घटना असल्याने पोलीस अधीक्षक श्री अबिनाश कुमार यांनी सायबर व तपासिक अंमलदार यांचे कडून सतत पाठपूरावा घेवून मार्गदर्शन केले व त्यामुळे तक्रारदार यांना मा. न्यायालयाच्या आदेशान्वये 55 लाख रूपये परत मिळाले असून उर्वरीत 8 लाख रूपये रक्कमे बाबत अधिक तपास चालु आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि धीरज चव्हाण व तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक आर.बी. शेंडगे पो.स्टे सायबरचे पो.उप.नि./ मारोती चव्हाण, पो.ना. 995 विलास राठोड व पो. कॉ 1435 काशनिाथ कारखेडे, यांनी पार पाडली आहे. मा. न्यायालयाचे आदेशाने अर्जदाराचे पैसे परत मिळाले ही नांदेड जिल्हयातील पहिलीच घटना असल्याने सदर कामगिरी बाबत यातील तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले असून मा. पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार व सर्व पोलीस अधिकारी व अमंलदाराचे अभिनंदन केले आहे. तक्रार यांचे विनंती नुसार त्यांचे नाव गोपणीय ठेवण्यात आले आहे.
मा. पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांनी आवाहन केले आहे की आपल्या सोबत ऑनलाईन फसवणुक झाल्यास तात्काळ 1930 या सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवर कॉल करून आपले सोबत फ्रॉड झाल्याची सविस्तर माहिती देण्यात यावी. किंवा cybercrime.gov.in या वेबसाईटवर जावून आपले सायबर क्राईम फ्रॉडची तक्रार करावी. त्यानंतर सायबर पोलीस स्टेशन नांदेड व आपले जवळचे पोलीस स्टेशनला जावून तक्रार दाखल करावी.
0 Comments