नदीकाठी असणाऱ्या नागाव विकास सोसायटीच्या ट्रान्सफार्मर मधील इलेक्ट्रिक साहित्याची 9 लाखांची चोरी
-----------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
शिरोली प्रतिनिधी
अमित खांडेकर
-----------------------------------------
नागाव, ता.हातकणंगले येथील नागाव विकास सोसायटीचे पाणीपुरवठा विभागाचे जॅकवेल शिरोली एमआयडीसी येथील पंचगंगा नदीकाठावर आहे . सध्या पावसाळा चालू असल्यामुळे व पूर परिस्थितीमुळे जॅकवेल बंद होते.बरेच दिवस कामगारांना याठिकाणी जाता आले नव्हते.तरी आज दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी संस्थेचे कामगार मेंटेनन्स रिपेअरी साठी जॅकवेल वर गेले होते. यावेळी त्यांना ट्रान्सफार्मर उचकटलेल्या अवस्थेत दिसला. ट्रान्सफार्मर जवळ जाऊन बघितले असता ट्रान्सफार्मर मधील इलेक्ट्रिक साहित्याची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ विकास सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना कळविले. घटना समजताच नागाव विकास सोसायटी पदाधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले.यामध्ये ट्रान्सफार्मर मधील इलेक्ट्रिक साहित्याची चोरी झाल्याचे आढळून आले. या चोरीमध्ये कॉपर वायर अंदाजे 300 किलो,ट्रान्सफार्मर ऑईल 418 लिटर,ट्रान्सफार्मर इन्सुलेशन स्टॅम्पिंग असे अंदाजे 9 लाख 18 हजार सहाशे रुपयांची चोरी झाल्याची तक्रार नागाव विकास सोसायटीने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.
0 Comments