धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने काळामवाडी धरणातून फक्त 950 क्यूशेक पाण्याचा विसर्ग सुरू.
धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने काळामवाडी धरणातून फक्त 950 क्यूशेक पाण्याचा विसर्ग सुरू.
-----------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-----------------------------------
दूधगंगा नगर तालुका राधानगरी येथील राजर्षी शाहू सागर धरण परिसरात पावसाची जोर कमी झाल्याने धरणाच्या परिचलण सूचनेनुसार पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी गुरुवारी सकाळी सात वाजता धरणाच्या वक्राद्वारा सांधव्यावरून 4600 क्यूशेक तर जलविद्युत केंद्रातून 950 क्यूशेक असे एकूण दूधगंगा नदी पात्रात 5550 क्यूशेक पाण्याचा विसर्ग धरणाच्या वक्राद्वारे सुरू करण्यात आला होता परंतु पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातून फक्त 950 क्यूशेक पाण्याचा विसर्गसोडण्यात येत असून
आज धरण परिसरात 40 मिलिमीटर इतका पाऊस झाला असून आज अखेर 3206 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे परिणामतः धरणाच्या जलाशयाची पातळी 642.88 फुट असून धरणाचा पाणीसाठा 616.054 द.ल.घ.मी. इतका आहे. आज स्थितीला धरणात 21.75 टी एम सी म्हणजेच 85.66% टक्के धरण , भरले असून पावसाळा जोर कमी झाल्याने धरणातून गुरुवारी सकाळी दहा वाजता 5550 क्यू शेक पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे त्यामुळे फक्त 950 क्यूशेक दूधगंगा नदीपात्रात सोडण्यात आले आहे अशी माहिती दूधगंगा पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली आहे
5550 क्यूशेक पाणी कमी केल्याने दूधगंगा नदीकाठच्या लोकांना दिलासा मिळाला आहे
Comments
Post a Comment