गांधीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात तुकारामांची दहशत.पोलीस प्रशासन हतबल.
---------------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार.
---------------------------------
आज-काल नवनवीन दैनिक व यु ट्यूब व पोर्टल चैनल यांची वारेमाप संख्या वाढत असल्याने त्यांना बातम्या पुरवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने खरोखरच पत्रकार आहे का याची शहानिशा न करता पत्रकार असल्याची आयडी देतात त्याला बातमी मधला ब पण कळत नाही असा पत्रकार म्हणून गल्लोगल्ली पोलीस ठाण्याच्या आवारात शासकीय कार्यालयात गळ्यात आयडी घालून हिंडताना व फिरताना शासकीय कर्मचाऱ्यांना त्रास देताना आढळून येत आहेत अशाच एका पत्रकाराने(तुकारामाने) गांधीनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना नाकी नाऊ आणले आहे.
गांधीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात एका पोर्टल चॅनेलचा तुकाराम नावाचा पत्रकार येऊन पोलीसांना शिव्यांची लाखोली वाहत असतो
दिसत नसल्याचे भासवितो परंतू मोटार सायकल चालवतो त्यांच्या प्रतापाने पोलीस अक्षरशः घाईला आले आहेत.
रात्र पाळीला महिला पोलिस डुयुटीवर असतात त्या वेळीं हा तुकाराम नावाचा पत्रकार पोलीस स्टेशनमध्ये घुसून महिला व ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांना शिव्याची लाखोली वाहतो रात्र पाळीला असलेल्या महिला पोलिसांची तर तारांबळ उडते मग त्या पोलीस स्टेशन मधील लाईट घालवून डुयुटी करतात. (महिला पोलीस कर्मचारी काय करणार एक म्हण आहे "बिल्ली के गले मे घंटा बांधेगा कौन)
अंगात जीव नाही पावशेर परंतु ओरडणे ह्या गल्लीतून त्या गल्लीला ऐकावयास जात असते
त्या पत्रकाराला फिट येते
त्यामुळे पोलीस कारवाई करायला धजत नाहीत त्याच्यावर कारवाई करावी तर तो ओरडल्यामुळे त्याला फिट येते व त्याच्या तोंडातून फेस निघू लागतो त्यामुळे पोलीस प्रशासन कारवाई करण्यास धजत नाहीत यामुळे तो पोलीस प्रशासनाचा गैरफायदा घेत आहे या प्रकारामुळे गांधीनगर मधील पोलीसासह सर्व पत्रकारांची प्रतिमा मलीन होत आहे तरी संबंधीत पोर्टल चॅनेल च्या संपादकांनी अश्या तुकाराम नावाच्या पत्रकाराकडून त्याचे ओळखपत्र काढून घ्यावे अशी मागणी गांधीनगर पत्रकार संघटना तसेच नागरिकांतून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे
0 Comments