Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बिद्री येथे मंत्री हसन मुश्रीफ व संजय मंडलिक यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन.

 बिद्री येथे मंत्री हसन मुश्रीफ व संजय मंडलिक यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन.

-----------------------------------

बिद्री प्रतिनिधी 

विजय कांबळे

-----------------------------------

  बिद्री ता कागल येथे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते बौद्ध समाज मंदिर, मातंग समाज मंदिर व ग्रामपंचायतीस नवीन घंटागाडी अशा अनेक विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी खासदार संजय मंडलिक उपस्थित होते. आपल्या मनोगतात त्यांनी मुश्रीफ साहेबांच्या विकास कामांचा आढावा घेतला. येत्या निवडणुकीत आपण ठामपणे त्यांच्या पाठीशी राहुयात असेही आवाहन त्यांनी केले.हसन मुश्रीफ यांनीही आतापर्यंत बिद्री गावात कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्याचे सांगितले मोफत वैद्यकीय सेवा, बांधकाम कामगार योजना, विधवा पेन्शन योजना,अशा अनेक योजना राबविल्याचे सांगितले तसेच लाकडी बहीण ही योजना बंद पडणारी नसुन ती कायम स्वरुपी यापुढे ही सुरु राहील असे सांगितले.यावेळी बांधकाम कामगारांना भांडी वाटत ग्रामपंचायतीच्या वतीने कचरा कुंडी वाटप मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत पाटील यांनी केले तर शीतलताई फराकटे मनोज फराकटे,शहाजी गायकवाड नामदेव पाटील यांची मनोगते झालीत.यावेळी कोल्हापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी अध्यक्षा शितल फराकटे कारखान्याचे संचालक रावसाहेब खिलारी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे पंचायत समिती सभापती जयदीप पवार, पंचायत समिती माजी सदस्य नंदकुमार पाटील सरपंच पांडुरंग चौगले उपसरपंच आनंदा पाटील सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments