Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून वाढदिवस साजरा.

शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून वाढदिवस साजरा.

--------------------------------------

रिसोड प्रतिनिधी

रणजीतसिंह ठाकुर 

--------------------------------------

     अलीकडे वाढदिवस साजरा करण्याचे प्रस्त मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. 

असे असताना हल्ली केक कापून नको त्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे फॅडही वाढत आहे. 

मात्र कुठल्याही गोष्टीला उपक्रमशीलतेची जोड देऊन त्यातून नवीन फायदा निर्माण केल्यास तो सर्वांसाठी एक वेगळा आदर्श ठरू शकतो. 

      असाच एक वेगळ्या आदर्शाचा पांयडा सामाजिक कार्य आणि उपक्रमात नेहमीच अग्रेसर असणारे मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष शिवाजी कवर यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक भान जोपासत आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा केला.

       शिवाजी कवर हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडीरायताळ येथे शिक्षक म्हणून कार्यरत असून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. आज 2 ऑगस्ट रोजी आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इतर खर्चाला फाटा देत आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व खाऊचे वाटप करून वाढदिवस साजरा केला.

      भेटवस्तू स्वरूपात मिळालेल्या वस्तूंचे लहान विद्यार्थ्यांना खूप आकर्षण असतं. वाढदिवसाच्या निमित्ताने मिळालेल्या या भेटवस्तू स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान बघून खऱ्या अर्थाने आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा झाल्याची भावना शिवाजी कवर यांनी व्यक्त केली. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांसह सहकारी शिक्षक उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments