सासू-सासरा व नवऱ्याच्या छळास कंटाळून विवाहतेचा आत्महत्येचा प्रयत्न.
-----------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे.
-----------------------------------
सासू 'सासरा" आणी नवरा यांच्या नेहमी होत असलेल्या छळाला कंटाळून राधानगरी तालूक्यातील कुंभारवाङी येथील विवाहीत महिलेने आज सकाळी आपल्या शेतातील राहात्या घरी थिमेंट सेवन करून आत्महत्तेचा प्रयत्न केला. कविता साताप्पा पाटील वय 38 असे त्यां विवाहित महिलेचे नाव आहे.
कविता हिचे माहेर राधानगरी तालूक्यातील ठिकपूर्ली असून 19 वर्षापूर्वी तिचा विवाह कुंभारवाङी येथील साताप्पा पांङूरंग पाटील यांच्याशी झाला होता. लग्नाच्या नंतर तिला दोन मूले झाल्यावर सासू"सासरा आणी नवरा याने छळ करण्यास सूरूवात केली. तिच्या नवर्याचे गावातीलच एका महिलेशी अनैतिक सबंध होते. त्यामूळे या दोघांच्यामध्ये नेहमी वाद होत होता. म्हणून कविता गेल्या सहा ते सहा महीण्यापासून सासू"सासरा आणी नवरा यांच्यापासून त्यांच्या शेतातील घरामध्ये विभक्त राहात होती.तिच्या मुलानां तिच्या नवर्याने आपल्याकङे घेतले आहेत. त्यानंतर मुलांनीही आपल्या आईला मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून कविताने आज सकाळी साङे दहा वाजण्याच्या सुमारास थिमेंट खाऊन आत्महत्तेचा प्रयत्न केला.यावेळी तीने बेशूद्ध अवस्थेत 108 गाङी व तिचा भाऊ अमोल चौगले यानां फोन करून या घटनेची माहीती दिली. त्यानंतर तिला उपचारासाठी राधानगरी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.त्यानंतर तिला पूढील उपचारासाठी कोल्हापूरातील शासकीय रूग्णालयात ( सी.पी.आर) दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली आहे,.
0 Comments