अपघात व वाईट वेळेतील सर्वांचा मदत करता स्वप्निल नरोटे शासकीय सेवेत जाणार का? लोकप्रतिनिधींची केवळ आश्वासने व निव्वळ गप्पाच.
अपघात व वाईट वेळेतील सर्वांचा मदत करता स्वप्निल नरोटे शासकीय सेवेत जाणार का? लोकप्रतिनिधींची केवळ आश्वासने व निव्वळ गप्पाच.
------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------
2003/2006पर्यंत ज्या विभागामध्ये काम केले तेथे जाताच ,एक जूना मेंबर भेटला व म्हणाला हा स्वप्नील नरुटे फॉडर मेंबर आहे या कॉलेजचा ,सकाळी महालक्ष्मी रेल्वे पकडून स्टेशन ते शेंडापार्क चालत 10Km जाऊन तेथे शूल्लक पगारात काम करून अनूभव घेतला नंतर एका डॉक्टर संरानी सायकल दिली त्या सायकल ने प्रवास सूरू केला नंतर त्या विभागातून खूप काही शिकलो व हातकणंगले व इतर भागात सेवा सूरू केली ,आज कोणी तर सहज बोलून जातो काम भारी आहे पण2005पासून आज पर्यंत निर्व्यसनी राहून 9000 हून अधिक प्रेताचे पोस्टमार्टम करून ,उदरनिर्वाह करणारा स्वप्नील मात्र तेथेच आहे,
सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी दिवस रात्रीचा विचार न करणारा स्वप्निल नरोटे समर्पण सेवा केंद्राच्या माध्यमातून रात्री अप रात्री सर्वांचे सेवेसाठी धावुन जाणारा स्वप्निल, बऱ्याच वेळा काम करत असताना सर्वसामान्य कुटुंबात कोणाकडे काही पैसे नसतात त्यांना मोफत सेवा देणारा स्वप्निल, बेवारस प्रेतांची स्वखर्चाने विल्हेवाट लावणारा स्वप्नील, रस्त्यावरती जेव्हा अपघात होतात तेव्हा सर्वप्रथम आठवण होते तो स्वप्निल, आत्महत्या होतात त्यावेळी प्रेत काढण्यासाठी प्रेताचा पोस्टमार्टम करण्यासाठी आठवतो तो स्वप्नील, वाईट घटणाच्या वेळी शासकीय यंत्रणेपासून सामान्य पुढाऱ्यापर्यंत सर्वांनाआठवणार स्वप्नीलला शासनाचा मात्र विसर पडत चालला आहे. गेल्या पंचवीस वर्षात 9000 पेक्षा जास्त प्रेतांची विल्हेवाट लावणाऱ्या स्वप्नील ला स्वतःचा उदरनिर्वाह करत असताना मात्र शासनाची वाट पहावी लागत आहे. ज्यावेळी एखादी वाईट घटना घडते त्यावेळी सर्वसामान्य जनता राजकीय पुढारी व सामाजिक कार्यकर्त्यांना स्वप्निल व त्याच्या समाजसेवा करणाऱ्या मुलाची आठवण होते, परंतु ते काम झाले की कोण स्वप्नील असा उद्गार येतो, स्वप्निल सारख्या समाजसेवा करणाऱ्या माणसांची खऱ्या अर्थाने शासनालाच गरज असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून स्वप्निलच्या या सेवेला प्राधान्य देणे गरजेचे असून ,महाराष्ट्र शासनाने स्वप्निलच्या कार्याची दखल घेऊन त्याला सरकारी शासकीय सेवेत रुजू करून घेणे गरजेचे आहे .अनेक वेळा प्रसिद्धी माध्यमांनी स्वप्निल ला शासकीय सेवेत रुजू करून घेण्यासंदर्भात आवाज उठवण्यात आला. प्रत्येक वेळी राजकीय पुढाऱ्यांनी केवळ आश्वासने सोडून काही दिले नाही.
त्यामुळे स्वप्निल देत असलेल्या सेवा अचानक जर स्वप्नीलने बंद केल्या तर हातकणंगले शिरोळ तालुक्यावर येणारे मोठे संकट राजकीय पुढारी शासकीय कर्मचारी व समाजसेवक निस्तारुन नेणार का असा सवाल सर्व सामान्य जनतेतून होत असून ?स्वप्निल सारख्या अल्प मोबदल्यात व मनापासून काम करणाऱ्या एका सर्वसामान्य युवकास शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी अनेक तरुण मंडळी व युवक संघटनांच्या माध्यमातून सध्या जोर धरत आहे. स्वप्निल नरोट यांच्या पंचवीस वर्षाच्या अविरत सेवेला सलाम.
पत्रकार विनोद शिंगे कुंभोज 98 50 64 23 72
Comments
Post a Comment