Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मनसे कोल्हापूर जिल्हा अध्यक्षांचा कार्यकर्त्यासह जनसुराज्य पक्षात जाहीर प्रवेश.

 मनसे कोल्हापूर जिल्हा अध्यक्षांचा कार्यकर्त्यासह जनसुराज्य पक्षात जाहीर प्रवेश.

---------------------------------

शाहुवाडी तालुका प्रतिनिधी 

आनंदा तेलवणकर

--------------------------------

शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यात आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांना जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. यामुळे गट-तट सोडून शाहूवाडी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ५०० कार्यकर्त्यांसह जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत असल्याचे युवराज जयवंतराव काटकर (बाबा) यांनी सांगितले

तसेच शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष व माजी तालुका अध्यक्ष धनाजी आगलावे,शित्तूर वारूण विभाग अध्यक्ष संभाजी आटकेकर,निनाई परळे विभाग अध्यक्ष शिवाजी किटके,विद्यार्थी सेना अध्यक्ष संगम शिराळकर (येळाणे),विद्यार्थी सेना उपतालुका अध्यक्ष अक्षय खेडेकर,वाहतुक सेना अध्यक्ष दिपक चांदणे (मलकापूर),तालुका सचिव प्रविण कांबळे (करंजोशी),महिला सेना तालुका अध्यक्षा शितल पाटील,महिला सेना उपतालुका अध्यक्षा अंजली हारडेकर,धोडींबा पाटील (अंबार्डे),संभाजी भरणकर (रिंगेवाडी) यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी जनसुराज्य शक्तीचे प्रवक्ते ॲड.राजेंद्र पाटील,वारणा दूध संघाचे व्हा.चेअरमन एच.आर.जाधव (आण्णा),कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरीडकर),कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबा लाड,शाहूवाडी तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष रंगराव खोपडे,सतिश लांबोरे,दिनेश पडवळ, नामदेव बांद्रे,रोहीत जांभळे,रमेश पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments