शाहू महाराजांनी निर्माण केलेला नाट्यक्षेत्रातील तंत्रज्ञानाचा आविष्कार पुन्हा उभा करू - उदय सामंत, उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य.

 शाहू महाराजांनी निर्माण केलेला नाट्यक्षेत्रातील तंत्रज्ञानाचा आविष्कार पुन्हा उभा करू - उदय सामंत, उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य.

--------------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

--------------------------------------

आगीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची केली पाहणी.

कोल्हापूर, दि.12* : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे सांस्कृतिक चळवळीतील अस्मिता असून आगीच्या दुर्दैवी घटनेमुळे नाट्य क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. शाहू महाराजांनी निर्माण केलेला नाट्यक्षेत्रातील तंत्रज्ञानाचा आविष्कार लवकरच पुन्हा उभा करू अशी ग्वाही राज्याचे उद्योग मंत्री, उदय सामंत यांनी दिली. केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्यामुळे जे काही नुकसान झाले त्याची पाहणी त्यांनी केली. ते म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या महाराष्ट्राला दिलेला संस्कृतिक ठेवा एका वर्षात पुन्हा उभा केला तर खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना आनंद होईल आणि याची खात्री मला आहे. शंभर वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी तंत्रज्ञानाचा अविष्कार निर्माण केलेला या ठिकाणी पाहायला मिळतो.  त्याच प्रकारचे नाट्यगृह पुन्हा बांधण्याचा सरकारचा मानस आहे आणि त्यासाठी आवश्यक कार्यवाही लवकरात लवकर करू. यावेळी महानगरपालिकेचे श्री.सरनोबत, नाट्य क्षेत्रातील कलावंत निर्माते यावेळी उपस्थित होते. यात विजय पाटकर, आनंद काळे, गिरीश महाजन, आनंद कुलकर्णी, मिलिंद अष्टेकर, प्रसाद जमदग्नी, किरण सिंह चव्हाण, रणजित जाधव यांचा समावेश होता.


नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन नाट्यगृहाची पाहणी केली व एका वर्षामध्ये जसं आहे तसं नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी वीस कोटी रुपयांची घोषणाही केली. मी त्यांचा सहकारी म्हणून नाही तर एक नाट्य क्षेत्रातला नाट्यप्रेमी म्हणून त्यांचे आभार मानतो असे त्यांनी भेटीदरम्यान पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, ही आग कशामुळे लागली यामध्ये दोन गोष्टी असू शकतात. एक नैसर्गिकरित्या लागलेली आग आणि कदाचित यामधून चौकशी अंती वेगळेही काही समोर येऊ शकते आणि त्या चौकशीचे आदेशही मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. महापालिका आयुक्तांशी बोलून जर चुकीच्या पद्धतीने काही झाले असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश देणार असल्याचे त्यांनी सांगितले.


*निर्मात्यांना भाडे परवडेल यासाठी नियोजन करा* - नाट्य क्षेत्रात आजच्या काळात श्रोत्यांना तिकिटाचे दर कमी असावेत, यासाठी निर्मात्यांचा निर्मिती खर्च कमी असावा लागतो. म्हणून नाट्यगृह उभारताना ऐतिहासिक बाज कायम ठेवून अंतर्गत सुविधा परवडतील अशा उभारा. यात प्रामुख्याने सौरऊर्जेचा वापर करून सुरक्षित विद्युत यंत्रणा उभारा. त्यामुळे नाट्यगृहाचे भाडे ५० टक्क्यांनी कमी होईल. तसेच नव्याने बांधकाम नियोजन करण्यासाठी नाट्यक्षेत्रातील अनुभवी लोकांचा समावेश करा. नाट्यक्षेत्रात कार्यक्रम घेण्यासाठी काय काय लागते ते अनुभव त्यांच्याकडूनच मिळतील. जेणेकरून भविष्यात नाट्यकला अधिक दृढ होण्यासाठी सर्वसामान्य कलावंत निर्माते पुढे येतील.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.