कुंभोज येथे रयत शिक्षण संस्था समोरिल रस्त्यासाठी उद्या ग्रामपंचायत समोर नागरिकांचे ठिया आंदोलन.
-----------------------------------
हातकणंगले प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------------
तुम्हीच सांगा आम्ही ज्ञानमंदिरात कसे जायचे?*
शाळेचा "चिखलमय रस्ता" या विषयाला वाचा फोडली. तरी देखील कुंभोज ग्रामपंचायत अथवा लोकप्रतिनिधी यांना या समस्येची साधी दखल घ्यावीशी वाटत नाही. यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते? रयत गुरुकूल पब्लिक स्कूल'ला पंधरा गावातून येणा-या ५०० विद्यार्थ्यांपैकी निम्मे विद्यार्थी कुंभोजचे असताना स्वतः ला लोकप्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या नेत्यांना काहीच कसे वाटत नाही? त्यामुळे उद्या, शनिवार दि. ३ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ठिक १:०० वाजता माळी,सपकाळ,आरगे मळ्यातील नागरिक व रयत गुरुकूल पब्लिक स्कूलचे शिक्षकवृंद कुंभोज ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलनासाठी बसणार आहेत. अपघाताला निमंत्रण देण्याऐवजी रयतच्या पालकांना ठिय्या आंदोलनात सहभागासाठी निमंत्रण देत आहोत. कुंभोजचे लोकप्रतिनिधी आमचे शत्रू नाहीत पण गेल्या तीन वर्षात शाळेसाठी केवळ दोनशे मीटर रस्ता करता येत नसेल तर हे अपयश कुणाचे?
0 Comments