Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

परिवर्तनाचा नायक पुस्तकाचे मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन.

 परिवर्तनाचा नायक पुस्तकाचे मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन.

-–--–-----------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

-–--–-----------------------

मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात झालेल्या परिवर्तनाची माहिती देणाऱ्या ‘परिवर्तनाचा नायक’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी मुंबईत मा. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.


यावेळी पुस्तकाचे लेखक व एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, मा. उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक आशिष चंदाराणा व नीता केळकर उपस्थित होते.


मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऊर्जामंत्रीपदाच्या अवघ्या सव्वा दोन वर्षांच्या काळात राज्यामध्ये ऊर्जा क्षेत्रात व्यापक सुधारणा करण्यात आल्या. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी ९००० मेगावॅटच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. हा जगातील सर्वात मोठा डिस्ट्रिब्युटेड रिन्युएबल एनर्जी प्रकल्प आहे. त्यासोबत नवीनकरणीय ऊर्जेचा वापर करण्यास चालना देणारी अनेक पावले टाकण्यात आली. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलिअन डॉलर्सची करण्यासाठी आवश्यक ऊर्जा सज्जता निर्माण करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठीही महत्त्वाचे प्रकल्प राबविण्यात आले. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य वीज ग्राहकांना दिलासा मिळण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले. मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अत्यंत कमी कालावधीत राज्यात ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन झाले व त्याचा लाभ राज्याला आगामी काळात होत राहणार आहे. याविषयीची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments