पकड्डीगडम म.प्र. कालवे सुधारणे साठी निधि मंजुर लाभक्षेत्रात सुजलाम सुफलाम होणार आबिद अली यांच्या पाठपुराव्याचे यश.
---------------------------------------
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधि
मंगेश तिखट
---------------------------------------
तालुका प्रतिनिधि कोरपना,,,, चंद्रपूर जिल्ह्यातील नाबार्ड सहाय्यीत पकड्डीगडमप्रकल्प 1997 98 पासून जलाशय पाणी संचयन करून सिंचनाला सुरुवात झाली होती परंतु प्रकल्पातील लाभ क्षेत्रात संपूर्ण कालवे अर्धवट व तूटफूट झाल्यानेलाभ क्षेत्रात अपेक्षित प्रस्तावित क्षेत्रामध्ये बांधावर पाणी पोहोचलेच नव्हते या करीता आबिद अलीयांनी सतत शासन प्रशासन कडे पाठपुरावा चालु ठेवला जलाशयाचे प्रकल्पाचे काम जलसंचयनक्षमता ११ . ०३ द ल घ मी होती मात्र प्रकल्पात प्रत्यक्षात जलसंचयन ७ . ०० द ल घ मीव यामधून अंबुजा सिमेंट कंपनीला पाणी दिल्यानंतर शेतकऱ्यांना गेल्या पंचवीस वर्षात बांधावर पाणीच पोहोचले नव्हते अंबुजाचा पाणी करा रद्द करावा व त्यांची गरज भागल्यामुळे मुदतवाढ देऊ नये याबाबत शासनाकडे आक्षेप दाखल केले व याचा अहवाल देखील शासनाने मागितला मात्र या लाभ क्षेत्रातील शेवटच्या टोकावर असलेल्या खिर्डी दहेगाव लोणी या गावातील शेताच्या बांधावर पाणी पोहोचवण्यात पाटबंधारे विभागाला यश आले नाही या क्षेत्रातील लाभ क्षेत्रात असलेल्या वडगाव इंजापूर पिपर्डा बेलगाव चिंचोली सोनुर्ली वनसडी आसन धानोली कुसळ कारगाव झुलबर्डी व रिठी गाव पारंबा दहेगाव चिचखोड खैरगाव अशी १९ गावाचा शिवार ७० % तहानलेलाच होता धरण लगत २ कि मी क्षेत्रात वनसडी शिवारात पाणी पोहचले नव्हते यामुळे धरण असून सुध्दा कोरडे निसर्गावर शेती होती यामुळे आर्थिक व दुष्काळ सारखे संकट शेतकऱ्यावर ओढत होतेही बाब सतत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून देत कुसळ येथील कार्यक्रम भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी मागणी केली याबाबत उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नाअजित दादा पवार यांची नागपूर अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सहसचिव आबिद अलीव या भागातील शेतकऱ्यासह शिष्टमंडळ पालकमंत्र्याच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्र्यांना भेट घेऊन पकडी गड्डम प्रकल्पाच्या सिंचन व्यथा त्यांच्यापुढे सादरीकरण केले यावर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देत महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत पकडी गड्डम मध्यम प्रकल्पाचे कालवे सुधारणा व खोलीकरणाच्या दुरुस्ती संबंधात तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले अधीक्षक अभियंता पी एन पाटील कार्यकारी अभियंता आर पी वराडे उपविभागीय अधिकारी एस अमीर यांनी पकडी गड्डम प्रकल्प मुख्य कालवा लघु कालवे वितरिका पाटचारीकामाचे सर्वेक्षण करून शासनाला अहवाल सादर केला विदर्भ पाटबंधारे महामंडळ नागपूर यांनी हा प्रस्ताव नियमक मंडळाला वेळेत सादर करून आदिवासी दुर्गम भागातील सिंचन प्रकल्पाला महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग शासन निर्णय क्र संकीर्ण- २०२३ / प्र.क्र- १४० / नि व स १ दि १४ मार्च २०२४ अंतर्गत प्रथम टप्प्यातील ६० प्रकल्पामध्ये पकडीगडम मध्यम प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील 19 गावाच्या कालवे सुधारणा कामासाठी88 कोटी 23 लक्ष निधी महाराष्ट्र शासनाने मंजूर केला या भागातील बांधावर सिंचन पोहोचवून शेतकऱ्यांचे अनेक वर्षाचे अपेक्षा पूर्ण होणार असून हरितक्रांतीचे स्वप्न साकार होणार आहे अनेक वर्षापासून दुर्लक्षित कामाकडे 2023 च्या नागपूर अधिवेशनात मा उप मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत भरीव निधी राज्य अर्थसंकल्पात उपलब्ध करून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच ज्यांच्या पुढाकारातून दिलेला शब्द पूर्ण करणारे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे या भागातील शेतकरी स आबिद अली अंकित लोढे महादेव पेंदोर विठ्ठल पिंपळकर विठ्ठल राठोड मारुती खापणे रमेश डाखरे भारत सिडाम विनोद परसुटकर विजय रणदिवे राकेश भटकले बाबाराव सिडाम आनंदराव मोहुर्ले मधुकर नांदेकर यांनी आभार मानले आहे शेतकऱ्यांमध्ये अनेक वर्षाची मागणी पूर्ण होत भरीव निधी दिल्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये आनंदाचा वातावरण आहे
0 Comments