सर्व्हर डाऊनमुळं लाडकी बहीण योजनेचं ॲप बंद.
सर्व्हर डाऊनमुळं लाडकी बहीण योजनेचं ॲप बंद.
------------------------------------
हातकणंगले प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------------
एक महिन्यापूर्वी राज्य सरकारनं 'मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना' जाहीर केली. आणि राज्यात महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या योजनेला तितक्याच पद्धतीत उस्फुर्त आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र, गेले काही दिवस सर्व्हर डाऊनमुळं लाडकी बहीण योजनेचं अॅप बंद झाल्याचं दिसून येतं आहे. त्यामुळं हजारों अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन दिवशी लाडकी बहीण योजनेचे पहिले दोन हप्ते खात्या वर जमा होणार असल्याची घोषणा सरकारनं केली. ही तारीख आता हळूहळू जवळ येतीय.
मात्र, सर्व्हर डाऊनमुळं या योजनेचं अॅप बंद असल्यानं अनेक लाडक्या बहिणी वेटिंगवर असल्याचं दिसून येतं आहेत. त्यामुळं वेटींग असलेल्या लाडक्या बहिणींमधून राज्य सरकारवर विरुद्ध नाराची व्यक्त होत आहे. या टेक्निकल त्रुटी लवकरात लवकर दूर केल्या जातील का आणि आपला फॉर्म सबमिट होऊन आपणही लाडके बहिणी योजनेचे पात्र होऊ का असे अनेक प्रश्न राज्यातील लाडक्या बहिणीं मधून व्यक्त होत आहेत.
Comments
Post a Comment