Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कुंभोज येथे संत नामदेव महाराज पुण्यतिथी साजरी; भाविकांची मांदियाळी.

 कुंभोज येथे संत नामदेव महाराज पुण्यतिथी साजरी; भाविकांची मांदियाळी.


------------------------------

कुंभोज प्रतिनिधी

विनोद शिंगे

-------------------------------

विविध अभंगांच्या गजरात संत नामदेव महाराज यांची पुण्यतिथी गुरुवारी (दि. 24) कुंभोज  हनुमान मंदिर येथे धार्मिक वातावरणात साजरी झाली. या निमित्त शिंपी समाजातील तरुण कार्यकर्त्यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले.


कुंभोज परिसरातील श्री संत नामदेव महाराज समाज मंडळ  यांच्या वतीने हनुमान मंदिरामध्ये सकाळपासून अभिषेक, पूजा व विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. वारकर्‍यांची भजने, संतनामाचा जयघोष, व महिला मंडळाची भजने, अशा भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणुकीचा सोहळा पार पडला. मिरवणुकीनंतर कीर्तन व गुणवंतांचा सत्कार समारंभ झाला. यावेळी  राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवराची प्रामुख्याने उपस्थिती होती. दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. संत नामदेव महाराज भवनासाठी निधी  व विद्यार्थ्यांच्या वसतिगृह उभारण्याचा संकल्प करण्यात आला, नामदेव शिंपी समाजाचा वतीने इयत्ता दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. समाजबांधव व पालकांची यावेळी उपस्थिती होती. दुपारी परिसरातील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी वाईकर, गणबावले, मिरजकर,महाडिक, शेंडगे तसेच नामदेव शिंपी समाज उपस्थित होता.


      कीर्तनांतून समाजप्रबोधन


दुपारी भजन, कीर्तन झाले. संत नामदेव महाराज यांच्या जीवनचरित्राविषयी त्यांनी कीर्तनातून माहिती दिली व समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी समाजबांधवांनी संघटित व्हावे, असे आवाहनही यावेळी केले. परिसरातील भाविक-श्रोत्यांची कीर्तनाला उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments