स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हाळशी येथे वृक्षारोपण कार्यक्रम.
-----------------------------------
.रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
-----------------------------------
जेव्हापासून मानवी मेंदूमध्ये उच्चभृ जीवन जगण्याची मनोकामना निर्माण होत गेली तेव्हापासुन पृथ्वीवर कळत-नकळत अनेक परिवर्तन घडत गेले.15 ऑगष्ट 1947 ला भारत देश स्वातंत्र्य झाला पण औद्योगिक व भौतिक सुधारणा करण्याच्या नादात तो पुन्हा जल , जमीन व वायू ह्या अत्यावश्यक व मुलभूत घटकाच्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकला गेला,असे मत छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त गजानन मुलंगे ह्यांनी स्मशान भुमी म्हाळशी येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाच्या संदर्भात व्यक्त केले.कार्यक्रमाकरिता सौ.साधनाताई खडसे सरपंच,खुर्शिदखॉं पठाण उपसरपंच,सदस्यगण,गणेश चोपडे ग्रामसेवक ग्रा.पं.म्हाळशी ,संदिप पंडित ,गणेश घुगे वनरक्षक सामाजिक वनिकरणं विभाग हिंगोली ,परिक्षेत्र सेनगाव ,रमेश भिंगे मुख्याध्यापक जि.प.शाळा म्हाळशी,शंकर खडसे तंटामुक्ती अध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते.सद्धस्थितीत मानव गल्लीपासून- दिल्लीपर्यंत केव्हाही व कोणासोबत ही संवाद साधू शकतो ,ह्या प्रगतीला तोड नाही हे तेवढेच खरे पण हि प्रगती करत असतांना मानवाच्या हातून पर्यावरणाचा वारेमाप र्हास झाला हे विसरून कसे चालणार?गेल्या काही वर्षापर्यंत आपण शुध्द हवामाना मध्ये रोगमुक्त जीवन जगलो पण यापुढे आपल्या भावी पिढी करीता सुद्धा वृक्षारोपणाच्या माध्यमातुन रोगमुक्त वातावरण उपलब्ध करून देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे आणि हाचं त्यांच्याकरिता अमुल्य ठेवा होईल असे म्हणणे वावगे होणार नाही.स्मशान भूमितील वृक्षारोपणाचा उल्लेख करतांना मुलंगे पुढे म्हणाले की,वेळप्रसंगी एप्रिल,मे व जुन महिन्याच्या रखरखत्या उन्हात अंत्यविधीचे कार्यक्रम करावे लागतात अश्या वेळेस त्या ठिकाणी वड,कडुनिंबा सारख्या विशाल छायादार वृक्षांची उपलब्धता अत्यावश्यक असते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समीर पठाण,सेवक जगन बरडे,वंदना वाघमारे,मनकर्णा इंगोले,वंदना टापरे,संतोष वाठोरे,अकिल पठाण,बबन वाठोरे ईत्यादिंनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राचार्य जनार्दन खडसे तर आभार वृक्षप्रेमी भास्कर वाठोरे यांनी मानले.
0 Comments