गडमुडशिंगीत आयशर टेम्पो मागे घेत असताना धडक बसून वृद्ध ठार.
गडमुडशिंगीत आयशर टेम्पो मागे घेत असताना धडक बसून वृद्ध ठार.
--------------------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
--------------------------------------
आयशर टेम्पो मागे घेताना धडक बसल्याने शंकर ज्ञानदेव मगदूम (वय ७०) या वृद्धाचा मृत्यू झाला. हा अपघात गडमुडशिंगी ता.करवीर येथे माळ भागातील मराठा चौक शेजारी मगदूम यांच्या राहत्या घरी बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. याबाबत टेम्पो चालक कृष्णा पडित शिरगावे
राहणार गडमुडशी याला गांधीनगर परिसर ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शंकर ज्ञानदेव मगदूम (वय 68) हे आपल्या दारामध्ये सकाळी साडेआठच्या सुमारास उभा राहिले होते. त्यावेळी त्यांच्या मागुन आयशर टेंपो क्रमांक एम एच 09 इ ए 4084 चे चालक टेम्पो मागे घेत होता. आयशर चालकाचे लक्ष नसल्यामुळे मागे उभे असलेल्या मगदूम यांना डंपर येऊन धडकला. यामुळे मगदूम हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ सी.पी.आर. रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु दुपारी त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली. मगदूम यांना पॅरालेसीस झाल्याने ते घरीच होते. त्यांच्या पश्चात दोन मुले व पत्नी आहे. त्यांच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत होती. याबाबत गांधीनगर पोलिसात रात्री उशिरा या अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.
मदत
Comments
Post a Comment