पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती.

पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती.

-------------------------------

 कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

--------------------------------


  22 सप्टेंबर  रोजी `पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील` यांची 137 वी जयंती साजरी करण्यात येणार असुन 8 वाजता एस टी स्टॅन्ड परिसरातील डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या  अर्धपुतळ्या जवळ अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

    कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या  पुतळ्यास अभिवादन करून रयत गुरुकुल पब्लिक स्कुल, आश्रम शाळा, केंद्र शाळा क्र. 62 व न्यू इंग्लिश स्कुल, कन्या शाळा, उर्दू शाळा, कुंभोज या शाळा मधील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात येणार असून  अण्णांच्या जन्मठिकाणी सदर फेरी पोहोचणार आहे.त्या नंतर अण्णांच्या जन्म ठिकाणी फोटो पूजन होईल. व तिथेच `कर्मवीर झाडे लावा, निसर्ग वाचवा अभियान` मध्ये सहभागी झालेल्या वृक्षप्रेमीना सर्टिफिकेट देण्यात येईल. अशी माहिती डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.`

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.