कुंभोज आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त सापडला-7 ऑक्टोंबर रोजी उद्घाटन.

 कुंभोज आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त सापडला-7 ऑक्टोंबर रोजी उद्घाटन.

---------------------------------------

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

----------------------------------------

गेल्या अनेक महिन्यापासून मागणी असणाऱ्या कुंभोज आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाचा प्रश्न निकाली निघाला असून सदर आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर सापडला आहे. परिणामी सात आक्टोबर रोजी सदर आरोग्य केंद्राची उद्घाटन होणार असल्याची माहिती कुंभोज ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आली आहे.

         कुंभोज ग्रामस्थांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा कुंभोज आरोग्य केंद्राचे उद्घाटन या विषयावर बऱ्याच वेळा सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी तसेच गावातील प्रमुख मंडळींनी प्रयत्न केले होते. त्यामध्ये ग्रामपंचायत कुंभोज यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून सदर आरोग्य केंद्राचे उद्घाटन करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी पालकमंत्री आमदार खासदार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने सदर आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाला 7 आक्टोबर चा मुहूर्त सापडला असून सदर रोजी आरोग्यंद्राचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत कुंभोज यांच्या व्दारे देण्यात आली आहे .

        कुंभोज मधील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन,दि 7 ऑक्टोंबर 2024 रोजी करण्याचे निश्चित झालेले आहे. व त्याबाबतचे पत्र आज जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद कोल्हापूर यांना ग्रामपंचायत कुंभोज यांच्याद्वारे देण्यात आले.कुंभोज ग्रामपंचयत सरपंच, उपसरपंच, कुंभोज परिसरातील विविध पक्षाचे पदाधिकारी, संघटना व नागरिक, पत्रकार संघटना सर्व गटनेते यांच्या प्रयत्नांना व पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

         तसेच आपल्या या आरोग्य केंद्रासाठी माजी मंत्री.राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या माध्यमातून रुग्णवाहीका मंजूर झालेली आहे. तेही केंद्राच्या उद्घाटनापूर्वी कुंभोज साठी देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.तसेच खा.धैयशिल माने, माजी आमदार.अमल महाडिक यांनीही कुंभोज आरोग्य केंद्र सर्वसोयुने सज्ज करून लवकरात लवकर त्याचे उद्धाटन करण्यासाठी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना अशा सुचनांचे पत्र दिले होते.

            7 ऑक्टोबर रोजी,कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, आजी-माजी मंत्री व खासदार,आजी-माजी आमदार,माजी जि.प. सदस्य तसेच तालुक्यातील इतर लोकप्रतिनिधी, तसेच कुंभोजमधील सर्व नागरिक,सर्व संस्थाचे पदाधिकारी,सर्व तरुण मंडळे, पत्रकार,सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य यांच्या उपस्थितीने कुंभोज प्राथमिक आरोग्य केंद्राचा उद्धाटन व लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. अशी माहिती ग्रामपंचायत कुंभोज यांच्या वतीने देण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.