शिवसेना चंद्रपुर तालुका व महिला आघाडीच्या वतीने आरक्षण विरोधी कांग्रेस खा. राहूल गांधींचा जाहीर निषेध..!
शिवसेना चंद्रपुर तालुका व महिला आघाडीच्या वतीने आरक्षण विरोधी कांग्रेस खा. राहूल गांधींचा जाहीर निषेध..!
-------------------------------------------
चंद्रपुर शहर प्रतिनिधी
राहुल बि.मेश्राम
-------------------------------------------
चंद्रपुर :- शिवसेना चंद्रपुर तालुका, महिला आघाडी व भारतीय कामगार संघटना जिल्हा चंद्रपुरच्या वतीने चंद्रपुर तालुका तालुका प्रमुख संतोषभाऊ पारखी व महिला आघाडी जिल्हाप्रमुख मिनलताई आत्राम यांचा नेतृत्वात खा. राहुल गांधी यांनी अमेरिका येथील वॉशिंग्टन मधील जार्ज टाऊन विद्यापिठामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत चर्चा करतांना कांग्रेस सरकार सत्तेत आल्यास अनु. जमाती अनु. जाती. इतर मागासवर्गीय यांचे आरक्षण रद्द करू असे सांगितले त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी मोर्चाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतला, गांधी चौक येथे करण्यात आले होते.
सदर जाहीर निषेध करता वेळेस वैद्यकिय जिल्हाप्रमुख तथा वाहतुक जिल्हाध्यक्ष अरविंद धिमान, वैद्यकिय जिल्हाप्रमुख तथा कामगार जिल्हा उपाध्यक्ष दिपक कामतवार, महिला आघाडी चंद्रपुर तालुका प्रमुख कृष्णा सुरमवार, महिला आघाडी भद्रावती तालुका प्रमुख योगिता घोरुड़े, चंद्रपुर उपतालुका गुरुदास मेश्राम, चंद्रपुर युवासेना महानगर प्रमुख दिपक रेड्डी, उप महानगर प्रमुख विश्वास खैरे, विभाग प्रमुख अजय चौधरी, कामगार भद्रावती तालुका प्रमुख योगेश म्यानेवार, वाहतुक महानगर प्रमुख निलेश गुजर,उप महानगर प्रमुख सुहास बटले, भद्रावती नगरसेवक नानाभाऊ दुर्गे, उप तालुका प्रमुख राधा कोल्हे, उप शहर प्रमुख सविता तुरारे, पत्रुजी भोयर, अंकित दहिवलकर, विवेक दुर्गे, शुभम बावणे, पंकज दुर्गे, रामा लारोकर, प्रवीण कटारे तसेच असंख्य महिला आघाडी व शिवसैनिक यांची उपस्थित होती.
Comments
Post a Comment