कसबा ठाणे येथे पर्यावरणपूरक गणेश विसर्जन.
कसबा ठाणे येथे पर्यावरणपूरक गणेश विसर्जन.
----------------------------------
पन्हाळा प्रतिनिधी
आशिष पाटील
----------------------------------
कसबा ठाणे (ता. पन्हाळा )येथे संकल्प युवा फौंडेशन यांच्या वतीने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जन व निर्माल्य गोळा करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमास कसबा ठाणे येथील गणेशभक्तांचा चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास 130 गणेश मूर्तींचे विसर्जन हे नदीमध्ये न करता गावातील पर्यावरणपूरक खणीत गणेश विसर्जन केले. या उपक्रमात फौंडेशनचे सदस्य वैभव मोळे , प्रशांत पाटील, नामदेव पाटील, सागर बा.पाटील , कौशिक पाटील, सागर वि.पाटील, शुभम मेडसिंग, मनोहर मरळकर, विजय पाटील,सागर ए.पाटील, मुरलीधर पाटील इ. तसेच सर्व सभासद आणि गावातील तरुण मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment