प्रश्नचिन्हाच्या तत्कालीन मुख्याध्यापकाकडून बनावट नियुक्तीपत्र. आश्रम शाळेच्या स्वयंपाकी पदासाठी मुख्याध्यापकांनी दोन लाख उकळले महिलेकडून पोलिसात तक्रार दाखल.

प्रश्नचिन्हाच्या तत्कालीन मुख्याध्यापकाकडून बनावट नियुक्तीपत्र. आश्रम शाळेच्या स्वयंपाकी पदासाठी मुख्याध्यापकांनी दोन लाख उकळले महिलेकडून पोलिसात तक्रार दाखल.

---------------------------------------

अमरावती जिल्हा प्रतिनिधी.

फ्रंट लाईव्ह न्युज महाराष्ट्र

पी.एन. देशमुख.

----------------------------------------

अमरावती. (नांदगाव खंडेश्वर)

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह आश्रम शाळेत स्वयंपाकी पदावर नोकरी लावून देण्यासाठी तत्कालीन मुख्याध्यापकाने दोन लाख रुपये उकळले. त्याने एकूण सात लाख ची मागणी केली होती, अशी तक्रार मंगरूळ चव्हाळा पोलीस ठाण्यात महिले कडून नोंदविण्यात आली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शुक्रानुसार वहिता नूरदास भोसले वय२९रा. पारधी बेडा, मंगरूळ चव्हाळा असे तक्रारदाराचे नाव तर प्रशांत बबन गोरमन वय ३२ असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तत्कालीन मुख्याध्यापकाचे नाव सप्टेंबर २०२२ रोजी वहिता भोसले यांना मुख्याध्यापक प्रशांत बोरामण याने सात लाखाची मागणी करीत स्वयंपाकी पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखविले. ही प्रचंड मोठी रक्कम असल्याने ती देऊ शकत नाही, असे म्हणतात त्याने तूर्तास दोन लाख रुपये दे असे सांगितले. उर्वरित पाच लाख रुपये या पदाचे ऑप्रउव्हल आल्यानंतर पगारातून कापले जातील, असे स्पष्ट केले वहीत आले दोन लाख रुपये दिल्यानंतर तिला शाळेच्या लेटर पॅड वर नियुक्त पत्र मिळाले. तिने या पदावर काम देखील केले. तथापि स्वयंपाकी पदाकरिता प्रस्ताव नसल्याचे काही दिवसानंतर तिच्या निदर्शनात आले. खोटे नीतू पत्र देऊन फसवणूक केल्याची लक्षात येतात तिने मंगरूळ चव्हाळा पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी मंगरूळ चव्हाळा पोलिसांनी २१ सप्टेंबर रोजी प्रशांत गोरमाण विरुद्ध भादवी की कलम ४२०,४६८,४७१अन्वये दाखल केला. समाजाने हे टाळणे केलेल्या मुलांच्या समक्षीकरणासाठी प्रश्नचिन्ह मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्नचिन्ह स्कूल ही महाराष्ट्राने भारताच्या इतर भागातील अनाथ आणि आदिवासी, विशेषता फासेपारधी समाजाच्या मुलांना मोफत शिक्षण आणि निवास सुविधा पुरवण्यास साठी समर्पित ना नफा संस्था आहे. या वंचित मुलांना इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे दर्जेदार शालेय शिक्षण तसेच त्यांना रोजगार क्षम बनविण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे ध्येय वतीने भोसले यांनी बाळगले आहे. प्रशांत गोरमाण यांनी उदात्त विचारांनी सुरू केलेल्या कार्यावर संस्थेवर अनेक आरोप लावले होते. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत कागदपत्रे ही बनावट आढळून आली होती. त्यामुळे मार्च २०२४ च्या सुमारास त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. असेही मतीन भोसले संस्थापक प्रश्नचिन्ह यांनी आमच्या प्रतिनिधीला माहिती दिली.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.