नृत्यांगना नाचवाल तर खबरदार !सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज गिरी.
नृत्यांगना नाचवाल तर खबरदार !सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज गिरी.
-----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
शिरोली प्रतिनिधी
अमित खांडेकर.
-----------------------------------
पुलाची शिरोली येथील एका मंडळावर नृत्यांगना नाचवल्या म्हणून 12 कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली
शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी घेतलेल्या कठोर भुमिकेमुळे शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांनी नृत्यांगना नाचवण्याच्या सुपारी रद्द केल्या गेली चाळीस वर्षे या शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गणेशोत्सव मध्ये नृत्यांगना नाचवल्या जात होत्या पंकज गिरी यांनी केलेल्या कारवाईमुळे शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महिला वर्गामधून समाधान व्यक्त करण्यात आले आहे व पोलीस प्रशासनाचे कौतुक करण्यात आले आहे.
अश्लील हावभाव अंग प्रदर्शन असं काही अढळून आले तर कारवाई करण्यात येईल अशा कोणत्याही मंडळाची गय करणार नाही असा इशारा
साहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी दिला आहे व त्यानी घेतलेल्या कडक भुमिकेमुळे आणी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे असले गैरप्रकार मोडीत निघत आहेत
Comments
Post a Comment