सांगली शहरात खड्ड्याची मालिका अजूनही सुरूच.

सांगली शहरात खड्ड्याची मालिका अजूनही सुरूच.

 -------------------------------------

मिरज तालुका  प्रतिनिधी 

राजू कदम 

-------------------------------------

सांगली शहरातील शंभर फुटी रस्त्यावर पडला सहावा खड्डा. 

लोकहित मंचची निदर्शने रस्त्याच्या ऑडिट साठी ना. नितीन गडकरी साहेबांचे भेट घेणार. 

सांगली शहरातील मुख्य रस्तावर खड्डे पडण्याचे प्रकार अजूनही थांबलेले नाही. 

शहरातील राजर्षी शाहू महाराज मार्ग (100 फुटी) रस्त्यावर दिगंबर मेडिकल जवळ पुन्हा वीस फुटाचे भगदाड पडले आहे. 


या विरोधात लोकहित मंचाच्यावतीने जोरदार निर्देशन करत मनपाचा निषेध केला. 

दिनांक 4 ऑक्टोंबर ला सांगलीत ना. नितीन गडकरी येणार आहे. 

त्यांच्याकडे रस्त्याचे ऑडिट व्हावे, अशी मागणी लोकहित मंचाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी सांगितले. 

सांगली शहरातील मुख्य रस्त्यावर गेल्या चार महिन्यापासून भले मोठे खड्डे पडत आहेत. या खड्ड्याची दुरुस्ती अद्याप  पूर्ण होत नाही तोपर्यंत नव्याने आणखी खड्डे पडू लागले आहेत. शंभर फुटी येथील दिगंबर मेडिकल, अहिल्यादेवी होळकर चौकासह ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. 

त्यामुळे सांगली शहरातील मुख्य रस्त्याच्या गुणवत्तेचा प्रश्न एरणीवर आला आहे. 

सहा महिन्यापूर्वीच कोट्यावधी रुपये खर्च करून शंभर फुटी रस्ता करण्यात आला आहे. पण या रस्त्याचे निकृष्ट काम सुरू असल्याचे तक्रार आयुक्ताकडे केले होती. 

आयुक्तांनी अभियंतांना कामाच्या गुणवत्तेवर लक्ष देण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

त्याकडे अभियंत्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे या रस्त्यावर तिसरा खड्डा पडला आहे. बांधकाम विभागात केवळ टक्केवारी चा बाजार सुरू आहे. आतापर्यंत महानगरपालिका क्षेत्रात सहा खड्डे पडले आहेत. याचा निषेध लोकहित मंचाच्या वतीने करण्यात आला. शंभर फुटी परिसरामध्ये नागरिकांनी आणि विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली. 

कमिशन घ्या अन खड्डा पाडा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या आहेत...

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.