मारुती मांगोरे यांना "जेम्स इन एज्युकेशन "पुरस्कार जाहीर.
मारुती मांगोरे यांना "जेम्स इन एज्युकेशन "पुरस्कार जाहीर.
-------------------------------------
कौलव प्रतिनिधी
संदीप कलिकते
-------------------------------------
भास्कराचार्य प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त दिला जाणारा "जेम्स इन एज्युकेशन2024" हा पुरस्कार
करंजफेण (ता राधानगरी) येथील कवी लेखक व कादंबरीकार मारुती ज्ञानदेव मांगोरे यांना नुकताच जाहीर करण्यात आला असल्याची माहिती श्री भास्कराचार्य प्रतिष्ठान कोल्हापूर विभागातील जेम्स इन एज्युकेशन पुरस्कार समितीचे संयोजक प्रा. सर्जेराव राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
राधानगरी तालुका मायबोली प्रतिष्ठानचे अध्यक्ष असलेले श्री मारुती मांगोरे हे कसबा तारळे येथील न्यू हायस्कूलमध्ये गेली तीस वर्षे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असून आजतागायत त्यांनी विविध विषयावर शेकडो व्याख्याने दिली आहेत त्यांची वंदोस (कथासंग्रह) व्याकुळ धरणी व गणगोत (कवितासंग्रह) तसेच
मांजरखिंड (कादंबरी) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत .
बुधवार दि.४ रोजी त्यांना विविध ज्येष्ठ साहित्यिकांच्या उपस्थितीमध्ये रोख रक्कम ,सन्मानचिन्ह, मानपत्र ,शाल श्रीफळ व विविध भेटवस्तू देऊन सन्मानित करणार असल्याची माहिती संयोजक प्रा. सर्जेराव राऊत यांनी दिली या कामी त्यांना ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य राजन गवस, .ता रा.पाटील ,श्रीराम पचिंद्रे,सौ.लता मांगोरे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment