करडवाडीत ' एक गाव एक गणपती ' चाळीस वर्षापासूनची संकल्पना आजही कायम.
करडवाडीत ' एक गाव एक गणपती ' चाळीस वर्षापासूनची संकल्पना आजही कायम.
------------------------------------
गारगोटी प्रतिनिधी
स्वरुपा खतकर
------------------------------------
‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत शनिवारी सकाळी घरोघरी गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात घरगुती गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली तर दिवसभर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते गणपतीमूर्ती वाजत - गाजत घेवून येत होते गणेशोत्सवामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले होते.
‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत सकाळ पासूनच दुपार पर्यंत गारगोटी -पाटगाव राज्य मार्गावर वाजत गाजत ढोल-ताच्याच्या, गजरात वाहनांच्या लांब लचक रांगा लागल्या होत्या. घरोघरी व तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यानी आणि शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. कुुंभारवाडा, शेेेणगांव,आकुुर्डे येेथूून सकाळपासून ढोलताशांच्या निनादात गारगोटी - कडगाांव रोडवर गणपतींची मूर्ती नेली जात असल्यामुळे मुुर्त्ती् पहायला लोकांची गर्दी वाढली होती
करडवाडी येथे ओमकार तरुण मंडळने यावर्षी गणपतीची प्राण प्रतिष्ठापणा केली आहे. या वर्षी कै. पांडुरंग कृष्णाजी मोरे यांच्या स्मरणात सात फुटी मुर्ती डॉ . सतीश पांडुरंग मोरे यांनी मूर्ती अर्पण केली आहे .गेली चाळीस वर्षा या ठिकाणी 'एक गाव एक गणपती ' ची प्राणप्रतिष्ठापना केली जात आहे . या मंडळाचे संस्थापक तालुका संघाचे संचालक बजरंग सुतार अध्यक्ष विद्यमान सरपंच विनोद कांबळे उपाध्यक्ष मनोहर मोरे तर गणेशमुर्ती उत्सव कमीटी अध्यक्ष सतिश बेलेकर उपाध्यक्ष अजित बेलेकर व मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . येथील विठ्ठल मंदिर मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर डॉ . सुरेखा सतिश मोरे व सरिता केरबा पाटील यांनी मुर्तींचे पुजन केले . केंद्रीय प्राथमिक शाळा करडवाडी चे सहावी सातवी विद्यार्थ्यांनी लेझीमच्या पारंपारिक वाद्याचा खेळ करत गणेश मूर्तीचे स्वागत केले. यावर्षी ओमकार तरुण मंडळाच्या वतीने , सोंगी भजन अश्या
विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .
चौकट
चाळीस वर्षांपूर्वी येथील शिवाजी तरुण मंडळाने एक गाव एक गणपतीची संकल्पना राबवली होती . याच मंडळाचा आदर्श घेऊन आज गावात पाच मंडळी असली तरी दरवर्षी एका मंडळाला प्राणप्रतिष्ठा करण्याचा मान मिळत आहे . या सार्वजनिक गणेशोत्सवात राजकारण बाजूला ठेवून संपूर्ण गावातील लहान थोर मंडळी सहभागी होत असतात या उपक्रमामुळे सर्वत्र गावचे कौतुक होत आहे .
Comments
Post a Comment