उंचगाव येथे स्वर्गीय.मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन..
उंचगाव येथे स्वर्गीय.मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन..
*तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब स्वर्गीय. मीनाताई ठाकरे यांच्या २८व्या स्मृतीदिना निमित्त माँसाहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. करवीर तालुका शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने बाल हनुमान तरुण मंडळ शिवसेना शाखा क्र.३ कार्यालय येथे माँसाहेब स्वर्गीय.मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.*
*यावेळी "अमर रहे अमर रहे माँसाहेब अमर रहे" या घोषवाक्यांनी शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.*
*यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उंचगाव प्रमुख दीपक रेडेकर, युवा सेना योगेश लोहार,शरद माळी,फेरीवाले संघटना बाळासाहेब नलवडे, स्वयंभू गाताडे, महेश पवार, नितीन निकम, विश्वनाथ गाताडे, सदाशिव मोहिते, रामराव पाटील, दत्तात्रेय विभुते, राजू गवळी,संकेत पाटील, सौरभ गाताडे. आधी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते*
🚩🚩🚩🙏🙏
Comments
Post a Comment