आरक्षण विरोधी खा राहूल गांधी अन् काँग्रेसचा खरा चेहरा उघड.
आरक्षण विरोधी खा राहूल गांधी अन् काँग्रेसचा खरा चेहरा उघड.
- भाजपाचे उत्तर भारतीय महाराष्ट्र प्रदेशाचे सचिव लखनसिंह ठाकुर यांची टीका
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी देशातील आरक्षणाबाबत अमेरिकेत केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण जोरदार तापत आहे. आरक्षण रद्द करण्याच्या निषेध नोंदवून आरक्षण विरोधी खा. गांधी आणि काँग्रेसचा खरा चेहरा आता जनतेसमोर उघड झाल्याची टीका भाजपा नेते लखनसिंह ठाकुर यांनी केली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण हिंदुस्थानच्या समानतेचा, समान संधीचा समान न्यायाच्या आधारावर निर्माण केलेल्या संविधानातून आलेले आमच्या हक्काचे आरक्षण काढून घेतले पाहिजे, अशी भूमिका खा. राहूल गांधींनी परदेशात घेतली. हा हिंदुस्थानच्या इतिहासातला काळा दिवस आहे. आरक्षण काढून टाकण्याचे वक्तव्य लोकसभा निवडणुकीच्या आधी बोलून दाखविले असते तर भारतातील जनता काँग्रेसला सळ की पळ करून सोडले असते. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दोन वेळा निवडणूकीत पराभूत करण्याचे कार्य आणि पाप काँग्रेसनेच केले. अशी बोचरी टीकाही काँग्रेसवर भाजपाचे उत्तर भारतीय महाराष्ट्र प्रदेशाचे सचिव लखनसिंह ठाकुर यांनी केली.
Comments
Post a Comment