रिसोड पंचायत समितीमध्ये कृषी संदर्भात कार्यक्रम.
रिसोड पंचायत समितीमध्ये कृषी संदर्भात कार्यक्रम
-_------------------------------------
रणजीत सिंह ठाकुर रिसोड प्रतिनिधी.
------_-----------------------------------
रिसोड तालुक्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत मेरी पॉलिसी मेरे हाथ हा उपक्रम राबविला जात आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी कार्यरत असून. दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी पंचायत समिती कार्यालय रिसोड येथे केंद्र शासन पुरस्कृत व राज्य शासनाच्या संयुक्त योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२४ मधील मेरी पॉलिसी मेरे हाथ हा उपक्रम पंचायत समिती कार्यालय रिसोड मध्ये माननीय गटविकास अधिकारी श्री किशोर लहाने सर व तसेच मा. सभापती बंडूभाऊ हाडे सर यांच्या हस्ते राबविण्यात आला.
यावेळी भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका व्यवस्थापक निखिल सरनाईक, विवेक डोंगरे, गोपाल लांभाडे, आकाश पडघान व शेतकरी अमोल देशमुख उपस्थित होते. आणि रिसोड तालुक्यात हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे.
Comments
Post a Comment