अंबाबाई देवीला पंचेचाळीस तोळ्याची सोन्याची प्रभावळ अर्पण करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्ट चा उपक्रम

 अंबाबाई देवीला पंचेचाळीस तोळ्याची सोन्याची प्रभावळ अर्पण 

करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्ट चा उपक्रम 

-------------------------------------
नबाब शेख 
कोल्हापूर 
------------------+-----------------
करवीर निवासीनीश्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या वतीनं आज नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला तब्ब्ल पस्तीस लाख रुपये किमतीची सोन्याची प्रभावळ अर्पण करण्यात आली. ट्रस्टच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांच्या हस्ते या सोन्याच्या प्रभावळी चं हसतांतरण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडं करण्यात आलं. समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे ही सोन्याची प्रभावळ सुपूर्द करण्यात आली. यापूर्वीच ट्रस्टच्या वतीनं अंबाबाई देवीला  सोन्याची पालखी अर्पण करण्यात आली आहे. तीन ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी ही सोन्याची प्रभावळ अंबाबाई देवीच्या सेवेत पंचेचाळीस तोळे सोन्याचा मुलामा देण्यात आलेल्या प्रभावळीचा वापर सुरु होणार आहे. महेंद्र ज्वेलर्स चे भरत ओसवाल यांच्या पुढाकारानं आणि अजित पंदरकर, गोरखनाथ चिंचवडे, अजित जाधव, नारायण बुधले, यांनी दिलेल्या देणगीतून ही प्रभावळ साकारली आहे. फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र साठी  कोल्हापुरहून  नवाब शेख, कोल्हापूर

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.