तासगावच्या रिंगरोडसाठी १७३ कोटी मंजूर* *वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहीती : आमदार सुमन ताई पाटील व रोहीत पाटील यांच्या प्रयत्नांना यश .

 *तासगावच्या रिंगरोडसाठी १७३ कोटी मंजूर* 

वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहीती : आमदार सुमन ताई पाटील व रोहीत पाटील यांच्या प्रयत्नांना यश .

--------------------------------------
मिरज तालुका :- प्रतिनिधी राजू कदम.
-------------------------------------------

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या तासगाव येथील रिंगरोडसाठी अखेर मंजुरी मिळाली आहे. सात किलोमीटरच्या रिंगरोडसाठी १७३ कोटी रूपये मंजूर झाले असल्याची माहीती रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. या रिंगरोडसाठी आमदार सुमन आर. आर. पाटील व रोहीत पाटील यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. स्व . आर. आर. पाटील यांनी बघितलेले स्वप्न अखेर पुर्ण  झाले असल्याचे आमदार सुमन पाटील व रोहीत पाटील यांनी सांगितले .  दरम्यान शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. शहरातील वाहतुकीची समस्या मिटावी यासाठी आमदार सुमन आर. आर. पाटील तसेच युवा नेते रोहीत पाटील वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांना वेळोवेळी भेटून रिंगरोड मंजूर व्हावा, अशी मागणी केली होती. रोहीत पाटील स्वत: दिल्ली येथे नितीन गडकरी यांना अनेक वेळा भेटले होते. 

दरम्यान नितीन गडकरी यांनी या रोड बाबत लवकरच निधी मंजूर करू, अशी ग्वाही दिली होती. अखेर आज सांगली येथे कार्यक्रमानिमित्त वाहतूक मंत्री नितीन गडकरी आले असता त्यांनी या सात किलोमीटरच्या रिंगरोडसाठी  १७३ कोटी रूपये मंजुरी दिली असल्याचे सांगत आवर्जून तासगाव कवठेमहांकाळचे आमदारांनी भेटून या रिंगरोडची मागणी केल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. या रिंगरोडसाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. शहरात मोठ्या प्रमणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती. यासाठी आमदार सुमन पाटील व रोहीत पाटील यांनी सतत पाठपुरावा करीत अखेर रस्त्यासाठी निधी मंजूर करून आणल्याने इथल्या वाहतुकीचा कायमचा प्रश्न मिटला आहे.दरम्यान, या रिंगरोडसाठी आमदार पाटील यांच्या प्रयत्नामुळे सुमारे 173 कोटी रुपये मंजूर झाल्यामुळे तासगाव येथील त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. सुमन पाटील, रोहित पाटील यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.