अश्विन पौर्णिमेनिमित्त मंदाताई वाघमारे* *यांच्या घरीभोजनदान.

 अश्विन पौर्णिमेनिमित्त  मंदाताई वाघमारे* *यांच्या घरीभोजनदान.

------------------------------------

  रिसोड प्रतिनीधी 

 रणजितसिह. ठाकुर.

-------------------------------------

 रिसोड: भारतीय बौद्ध महासभेच्या  जिल्हा सरचिटणीस तथा  केंद्रीय शिक्षिका  आयुनी.मंदाताई वाघमारे  व सुजाताताई खरात  यांनी  आषाढ पौर्णिमे पासुन  वर्षावास  काळात  उपोसथ  केले. त्याचा  समारोप  अश्विन पौर्णिमेनिमित्त  मंदाताई वाघमारे  यांच्या निवासस्थानी  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तिना पुष्प व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्रिशरण पंचशील,बुद्ध  पुजा व परित्राण  पाठ  घेण्यात  आला , अश्विन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष  तथा  केंद्रीय शिक्षक शालिग्राम  पठाडे  यांनी   बौद्ध  धम्मात  अश्विन  पौर्णिमेचे महत्व, वर्षावास व

 उपोसथाचे महत्त्व  सांगितले.  बुद्ध  काळात  उपासक  ,उपासिकंचे   आचरण  कशाप्रकारे  होते ते सांगितले. 

या  प्रसंगी  उपस्थित  विभागीय  संघटिका संध्याताई पंडित, प्रा.रंगनाथ धांडे ,प्रमिलाताई  शेवाळे, माधव हिवाळे, प्रा.माधव खोडके, मंचक  वाठोरे सर, नितीन  नवघरे. रामजी बानकर,देविदास सोनुने, कैलास सूर्वे, गणेश कवडे, रामभाऊ  अंभोरे, मंदाताई  धांडे, मीनाताई चव्हाण, समजावताई खरात  ,गुंफाबाई इंगोले, संगिता जमधाडे, मायाताई गवई,अर्चना अंभोरे,नंदा मोरे,जयश्री ताई , मीनाताई  अंभोरे, जावळे ताई ,खैरे बाई , गवई माय,वानखेडे  माय, त्रिवेणी बाई. रेखा जमधाडे, होते. शेवटी  भोजनदान  देण्यात  आले. 

 तसेच  अश्विन पौर्णिमेनिमित्त  प्रा.रमेश  खैरे  यांच्या घरी  सुद्धा  वर्षावास व उपोसथ  पालन  केले.  त्या निमित्त  पुजाविधी  करण्यात  आला. व उपस्थित  भन्तेजी  चंद्रमनी  यांनी उपस्थितताना  शील  दीले  व प्रवचन  केले.  या ठिकाणी  प्रा. नंदकिशोर खैरे, प्रा.श्रीराम  काळसरे  ,ग्यानुजी  खैरे, खंदारे सर  उपस्थित  होते.  कार्यक्रम  समारोप झाल्यावर  खीर दान  केले.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.