रिसोड तालुक्यातील खडकी सदार येथे मेरी पॉलिसी मेरे हाथ हा उपक्रम राबविला.
रिसोड तालुक्यातील खडकी सदार येथे मेरी पॉलिसी मेरे हाथ हा उपक्रम राबविला.
--------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
---------------------------------
रिसोड तालुक्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत मेरी पॉलिसी मेरे हात हा उपक्रम राबविला जात आहे,वाशिम जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी कार्यरत असून दिनांक 6 ऑक्टोंबर 2024 रोजी खडकी सदार येथे केंद्र सरकार पुरस्कृत व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमानांनी राबविल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री फसल बीमा योजना खरीप हंगाम 2024 मधील मेरी पॉलिसी मेरे हात या उपक्रमांतर्गत खडकी सदार तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथे प्रधानमंत्री फसल बीमा योजनेमध्ये सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांना सरपंच साहेबाच्या हस्ते पॉलिसी वितरण करण्यात आले यावेळी खडकी सदार चे मा.सरपंच आणि भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका व्यवस्थापक विवेक डोंगरे व शेतकरी, महिला उपस्थित होत्या आणि रिसोड तालुक्यांमध्ये हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे.
Comments
Post a Comment