स्व. रामभाऊ टेमधरे स्मुर्ती तीन व्यख्यानमाला शुक्रवारपासून.

 स्व. रामभाऊ टेमधरे स्मुर्ती तीन व्यख्यानमाला शुक्रवारपासून.

------------------------------- 

रिसोड/प्रतिनिधी

 रणजीत सिंह ठाकुर

------------------------------- 

.-स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाच्या विद्यमाने आयोजित तीन दिवशीय स्व. रामभाऊ टेमधरे स्मुर्ती व्याख्यानमालेची सुरुवात 18 ऑक्टोबर शुक्रवार पासून सायंकाळी ठीक 5:30 वाजता स्थानिक स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय रिसोड येथे होणार आहे.स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक प्रा. कमलाकर टेमधरे यांनी वडिलांच्या स्मुर्ती प्रित्यर्थ ही व्याख्यानमाला सुरु केली असून यावर्षी यशस्वीपणे सदोतीस वर्षे पूर्ण होत आहेत.या व्याख्यानमालेला महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील अनेक नामवंतांनी हजेरी लावली आहे. प्रा. कमलाकर टेमधरे वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.वैचारिकदृष्ट्या समाजमन सुदृढ व निरोगी राहावे यासाठी व्याख्यानमाला व तत्सम ज्ञानी लोकांचे मार्गदर्शन महत्वपूर्ण ठरते. यासाठी सतत 37 वर्षांपासून वाचकांच्या व श्रोत्याच्या सेवेत व्याख्यानमाला समर्पित आहे.18 ऑक्टोबर पासून तीन दिवशीय सुरु होणाऱ्या पहिल्या दिवशी डॉ नंदकिशोर रंजवे सचिव डॉक्टर असोसिएशन रिसोड यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यानमालेचे पहिले पुष्प सुप्रसिद्ध आयुर्वेद विशारद डॉ.किशोर नागूलकर हे "आयुर्वेदिक पंचकर्म म्हणजे आनंदातून आजाराची निवृत्ती" या विषयावर गुंफणार आहेत.

 19 ऑक्टोबर शनिवारी प्रा.डॉ.भाऊराव रामेश्वर तनपुरे इतिहास विभाग प्रमुख मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय वाशीम हे "सुख पर्वतावढे" या विषयावर दुसरे पुष्प गुंफतील तररविवार 20 ऑक्टोबरला  शेवटच्या तिसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध कवि प्रा. अण्णा जगताप संस्थापक निसर्गाची शाळा परभणी हे निरोगी जीवानाचा मार्ग निसर्गातून जातो हा मार्मिक विषय गमतीदार पद्धतीने मांडणार आहेत.रिसोड शहरातील साहित्य क्षेत्रातील रसिकाना ही तीन दिवसाची पर्वणी आणि दिवाळीचे वैचारिक फराळ असणार आहे.तरी श्रोत्यांनी तिन्ही दिवस दररोज सायंकाळी ठीक 5:30 वाजता स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय,तहसील कार्यलय समोर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन व्याख्यानमाला आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.