गोहेगाव हाडे येथील विध्यार्थी शांतनू राजेश हाडे (19)याने स्पेन मधील ब्रांसीलीनो येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकवीला.
गोहेगाव हाडे येथील विध्यार्थी शांतनू राजेश हाडे (19)याने स्पेन मधील ब्रांसीलीनो येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकवीला.
-------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजितसिह. ठाकुर
-------------------------------
12डिसेंबर ते 22डिसेंबर दरम्यान आयोजित स्पेन मधील सनवे सीटगेस ही प्रतिष्टेची आंतरराष्ट्रीय रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा आहे.या स्पर्धेत भारतीय प्रतिनिधी म्हणून शंतनू ने पाचवा क्रमांक घेऊन आपली चमक दाखविली आहे. विशेष म्हणजे त्याची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती.या स्पर्धात विविध देशातील प्रख्यात बुद्धिबळ पटू सहभागी झाले होते.शंतनूच्या दृत व अचूक रणनीतीने त्यांने विरोधकांवर मात केली. सद्या तो आपले मामा बाळासाहेब भिसडे मसालापेन याच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे शिक्षण घेत आहे. आपल्या यशाचे श्रेय त्याने आई वडील व आजोबा सुदामजी हाडे यांना व शिक्षकांना दिले आहे. यावेळी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, आमदार भावनाताई गवळी, माजी आमदार विजयराव जाधव यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment