धोकादायक वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करा शिवसेना वाहतूक सेनेची मागणी.

 धोकादायक वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करा शिवसेना वाहतूक सेनेची मागणी.

गांधीनगर:- अँग्रीकल्चर पासींग वाहनातून राजरोस कमर्शियल आणि धोकादायक, बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करावी या मागणीची निवेदन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर यांना शिवसेना  महाराष्ट्र वाहतूक सेना (महासंघ) (उबाठा) गटाच्या वतीने देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की जिल्ह्यात तसेच शहरात   ट्रॅक्टर ट्रॉली, डंपर, मिक्सर, या वाहनातून बांधकाम साहित्याची, नियमबाह्य वाहतूक करत आहेत. त्या वाहनचालकांचे परवाना तसेच अन्य कोणत्याही कायदेशीर बाबी पूर्ण नसतात. भरधाव वाहन चालवले जात आहे. बिसिस्त वाहन पार्किंग, अशामुळे  शहरासह ग्रामीण भागात अपघातात वाढ  होत आहे. सध्या साखर कारखाने सुरू असून ऊस ट्रॅक्टर ट्रॉलीमधुन क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरून जीवघेणी वाहतूक सुरू आहे. ड्रायव्हर कडून कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. कायदा  हा सर्वांना समान असून प्रादेशिक विभागाच्या भरारी पथकाकडून मात्र छोटे-मोठे टेम्पो व्यवसायिक, ऑटो रिक्षा, अशा वाहनावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. तो अन्यायकारक आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडवून तसेच अपघाताला निमंत्रण देणाऱ्या अशा बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश परमार यांच्यासह शिष्ट मंडळांनी केली. यावेळी उपजिल्हाध्यक्ष संदीप पाटील, तालुकाध्यक्ष दत्ता फराकटे, अरुण पाटील, महावीर गायकवाड ,शिवम परमार, आदी उपस्थित होते.


फोटो ओळ:- अँग्रीकल्चर पासिंग वाहनातून कमर्शियल वाहतूक तसेच ओव्हरलोड जीवघेणी वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करावी या मागणीचे निवेदन शिवसेना वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश परमार यांच्या सह शिष्ट मंडळांने  उपविभागीय अधिकारी संजय भोर यांना दिले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.