इचलकरंजी भूमी अभिलेख अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात.

 इचलकरंजी भूमी अभिलेख अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात.

-------------------------------

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

-------------------------------

75 हजार रुपयांच्या लाचेची मागणी अँटीकरप्शन ब्युरोची कारवाई इचलकरजी भुमी अभिलेख कार्यालयातील प्रकार उघडकीस आला आहे .तक्रारदार यांनी त्यांच्या मालकीच्या प्लॉट्सचे सागलीकरण करण्यासाठी अर्ज सादर केला होता .या प्रक्रियेसाठी संबंधित अधिकारी दुष्यंत कोळी यांनी तक्रारदारां कडून 75 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी आन्टि करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाची पडताळणी करण्यात आली, पडताळणीत नगर भूमापन अधिकारी दुष्यंत कोळी यांनी जिल्हाधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयातून मंजुरी घेण्यासाठी लाचेची मागणी केल्याची निष्पन्न झाले या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली, आरोपी कोळी याला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

 कारवाई अँटीकरप्शन ब्युरोचे पोलीस उप आयुक्त शिरीष सरदेशपांडे व अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील पोलीस निरीक्षक बापू साळुंखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.विनोद शिंगे कुंभोज

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.