पंचगंगा नदीवरील औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनची गळती काढली.
पंचगंगा नदीवरील औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनची गळती काढली.
शिरोली शिरोली औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची पंचगंगा पुलावर लागलेली गळती ९० टक्के काढली असून उर्वरित गळती रविवारी आणि सोमवारी काढली जाणार असल्याचे औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी आय. ए नाईक यांनी सांगितले. या गळती बाबत विविध माध्यमांनी वृत प्रसारित केले होते याची दखल औद्योगिक विकास महामंडळाने घेऊन तात्काळ गळती काढण्याचे काम हाती घेतले आहे. गेल्या १५ दिवसापासून पंचगंगा नदीवरच औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईनला मोठी गळती लागली असून यामधून दूधगंगेचे शुद्ध पाणी पंचगंगा नदीत मिसळत होते, मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने या गळतीमुळे शिरोली औद्योगिक वसाहतीला कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. ही गळती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने शनिवारी दुपारी १२ वाजताच पंचगंगा नदीवर वाहतूक सुरू असताना पाळणा सोडून मनुष्यबळाच्या सहाय्याने काढला सुरुवात केली. गळती लागलेल्या लोखंडी पाईपला दोन्ही बाजूंनी कपलींग घालून आत रबरी पॅकींग टाकले आहे. हे काम धोकादायक रित्या अंतराळी पाळणा सोडून करण्यात आले आहे. जवळपास ५ कर्मचारी ४, ते ५ काम करत होते. यानंतर पाण्याची गळती ९० टक्के पर्यंत बंद झाली आहे. अंधार पडला त्यामुळे उर्वरित काम रविवारी आणि सोमवारी केले जाणार असल्याचे औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी आय ए नाईक यांनी सांगितले. सध्या ९० टक्के गळती काढण्यात औद्योगिक महामंडळाचे कर्मचारी यशस्वी झाले
Comments
Post a Comment